जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षा केंद्राचे राज्यपालांच्याहस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:08 PM2017-12-20T13:08:45+5:302017-12-20T13:12:23+5:30
केंद्राची पाहणी करून उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 20- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उद्घाटन बुधवार, 20 डिसेंबर रोजी राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या चर्चेत राज्यपालांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत ऑनलाईन परीक्षा केंद्रासाठी निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या गणितीयशास्त्र प्रशाळेच्या विस्तारीत इमारतीत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते सकाळी झाले. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन. गुजराथी, ऑनलाईन परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.समीर नारखेडे हे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर राज्यपालांनी या केंद्राची पाहणी करून विद्याथ्र्याना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रारंभी कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांनी राज्यपालांचे पुस्तक देवून स्वागत केले. त्यानंतर जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी राज्यपालांसमोर विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. परीक्षांचे निकाल 30 ते 45 दिवसांच्या आत लावण्यात आलेले यश, नंदुरबार येथे उभारण्यात येणा:या आदिवासी अकादमीची माहिती व त्यात सुरु केले जाणारे अभ्यासक्रम, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती सादरीकरणात देण्यात आली. आदिवासी अकादमीबाबत तसेच चाळीसगाव येथे राज्य शासनातर्फे उभारण्यात येणा:या भास्कराचार्य गणितीय नगरीतील काही अभ्यासक्रमाबाबत राज्यपालांनी कुलगुरुंसमवेत चर्चा केली. विद्यापीठाच्या आश्वासक प्रगतीबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. या संवादाच्या वेळी विद्यापीठ प्रशाळेचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.
आज उद्घाटन झालेल्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात सहा कक्षांमध्ये 215 संगणक ठेवण्यात आल असून ते अद्ययावत चार सव्र्हरशी जोडण्यात आले आहेत. विद्याथ्र्यांना विविध स्पर्धा परीक्षांचा एकाच छताखाली सराव करण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार असून विविध कार्यशाळा, प्रशिक्षण तसेच पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा, प्री-पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा यासाठीदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. सरकारकडून घेण्यात येणा:या विविध नोकर भरतीच्या प्रवेश परीक्षेसाठीदेखील हे केंद्र उपयोगी ठरणार आहे.