उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:04 PM2017-08-29T13:04:14+5:302017-08-29T13:16:02+5:30

हरियाणा पॅटर्न : शाळा प्रवेश रद्दचा इशारा; मनपा शेवटचा उपाय

Opening the toilets: Their ration, power connections will be closed | उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार

उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार

Next
ठळक मुद्देशहरात 58 ठिकाणी नागरिक उघडय़ावर शौचास बसतातजनजागरणही सुरूतांबापुरा भागात उघडय़ावर शौचालयास बसणा:यांचे प्रमाण अधिक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  हगणदरी मुक्तीसाठी आता शेवटचा उपाय म्हणून वैयक्तीक शौचालयाचे अनुदान घेऊन ते न बांधणारे व उघडय़ावर शौचास बसणा:यांना रेशनवर धान्य न देणे व त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्याचे प्रस्तावित आहे. तरीही दाद न दिल्यास  संबंधितांच्या पाल्यांचा शाळांचा प्रवेश रद्द करण्याचा इशारा दिला जावा अशा सूचना मनपात सोमवारी आयोजित बैठकीत देण्यात आल्या. हा ‘हरियाणा पॅटर्न’ असल्याचीही माहिती मिळाली.
शहरात 58 ठिकाणी नागरिक उघडय़ावर शौचास बसतात. शासनाच्या स्वच्छ भारत अभियान समितीतील अधिकारी सुधाकर बोबडे यांनी या महिन्याच्या प्रारंभी शहरास भेट देऊन कडक शब्दात समज दिली होती. हगणदरीमुक्ती 31 ऑगस्टर्पयत न  झाल्यास महापालिकेस शासनाकडून दिले जाणारे अनुदान बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीतील महापालिका अधिकच अडचणीत येण्याची भिती आहे. 
आसोदा रोडला 100 वैयक्तिक शौचालये उभारण्याच्या कामांना गती मिळाली आहे. तर काही ठिकाणी तयार शौचालये देण्यात येणार आहेत. 
डीबीएसआय या संस्थेचे प्रमुख साजीद अन्सारी हे जळगावात आले आहेत. ते  शहरात फिरून जनजागृती करणार आहेत. शासनाकडून त्यांची या मोहीमेसाठी नियुक्ती आहे. 
 उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, निरीक्षक, प्रभाग समिती अधिका:यांची बैठक घेतली. शहरात 118 सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती सुरू आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तांबापुरा भागात उघडय़ावर शौचालयास बसणा:यांचे प्रमाण अधिक आहे. या भागात गुडमॉर्निग पथकात 30 जण सकाळी व सायंकाळी गस्तीसाठी नियुक्त आहेत.

Web Title: Opening the toilets: Their ration, power connections will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.