मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 09:20 PM2018-12-01T21:20:36+5:302018-12-01T21:21:27+5:30
मुक्ताईनगर , जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पेन्शन व वेतनश्रेणी आदी मागण्यांसाठी ग्रंथालय कर्मचाºयांनी शनिवारी काळ्या ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पेन्शन व वेतनश्रेणी आदी मागण्यांसाठी ग्रंथालय कर्मचाºयांनी शनिवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. विशेष म्हणजे या काळ्या फिती लावण्याच्या आंदोलनात ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई यांनीदेखील सहभाग नोंदवला.
आज सार्वजनिक वाचनालयात शासनाने ग्रंथालय कर्मचाºयांचे वेतनश्रेणी, पेन्शन या प्रमुख मागण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज करताना ग्रंथपाल मधुकर वानखेडे, लिपिक अनिल न्हावकर, शिपाई शांताराम महाजन यांच्या मागण्यांना पाठिंबा देताना वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए.भोई, उपाध्यक्ष शरद महाजन, लीलाबाई पवार, नामदेव भोई, अनिल वाडीले, बी.डी.बारी, भानुदास पाटील यांच्यासह सर्व संचालक, वाचक, हितचिंतक उपस्थित होते.