भुसावळ विभागातून महिनाभरात आठ ऑक्सिजन एक्स्प्रेसचे संचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:02+5:302021-05-24T04:15:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा ...

Operation of eight Oxygen Expresses in a month from Bhusawal division | भुसावळ विभागातून महिनाभरात आठ ऑक्सिजन एक्स्प्रेसचे संचालन

भुसावळ विभागातून महिनाभरात आठ ऑक्सिजन एक्स्प्रेसचे संचालन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने अखेर रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक करावी लागली. भुसावळ विभागातून महिनाभरात रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक यशस्वी झाली असून, आतापर्यंत आठ ऑक्सिजन एक्स्प्रेसचे संचालन झाले आहे. यात नाशिक रेल्वे स्टेशनवर ४ ऑक्सिजन टँकर्स अर्थात ६५.२९ टन इतका ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात ऑक्सिजनचा एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला. ऑक्सिजनअभावी अनेक कोरोनाबाधितांचे जीव जात असल्यामुळे केंद्र सरकारने विशाखापट्टणम येथून रेल्वेने देशभरात विविध ठिकाणी ऑक्सिजनचे टँकर पोहोचवले. विशेष म्हणजे यातील आठ ऑक्सिजन एक्स्प्रेस भुसावळ विभागातून धावल्या.

या प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या होत्या. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला साईडला न टाकता तात्काळ मार्ग उपलब्ध करून देण्यात आले. तसेच खबरदारी म्हणून ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली होती. त्यामुळे भुसावळ विभागातून आठही ऑक्सिजन एक्स्प्रेसचे यशस्वी संचालन झाल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, या ऑक्सिजन एक्स्प्रेसवर लोको पायलट व गार्ड असलेल्या कर्मचाऱ्यांचा भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे यशस्वीपणे ऑक्सिजनची वाहतूक केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

इन्फो :

ऑक्सिजन एक्स्प्रेसला वेगाने व सुरक्षितपणे प्रवास करता येण्यासाठी, रेल्वेरूळ खुले ठेवून अतिशय काटेकोर पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे ऑक्सिजन एक्स्प्रेसचे यशस्वी संचालन करता आले, याचा अभिमान आहे.

- वि. के. मीना, लोको पायलट.

Web Title: Operation of eight Oxygen Expresses in a month from Bhusawal division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.