स्थायी समिती सभापतीपदासाठी सेनेकडून बंडखोरांनाच संधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:28+5:302021-09-21T04:18:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार असून, सभापतीपदासाठी शिवसेनेकडून बंडखोरांपैकी एकाला संधी ...

Opportunity for rebels from Sena for Standing Committee Chairman? | स्थायी समिती सभापतीपदासाठी सेनेकडून बंडखोरांनाच संधी?

स्थायी समिती सभापतीपदासाठी सेनेकडून बंडखोरांनाच संधी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार असून, सभापतीपदासाठी शिवसेनेकडून बंडखोरांपैकी एकाला संधी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपमधील फुटीच्या वेळेसच सभापतीपद हे बंडखोरांनाच दिले जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे आता २७ बंडखोरांपैकी एका नावाची निवड लवकरच केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

मनपा स्थायी समितीमधील ८ सदस्य निवृत्त करण्याबाबतचा प्रस्तावावर सोमवारी झालेल्या स्थायीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येत्या सभेत ८ सदस्य निवृत्त होऊन नवीन ८ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा जागेवर नव्याने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सदस्यांचा नावावरून भाजप व भाजप बंडखोर नगरसेवक गटनेतेपदावरून आमने-सामने आले आहेत. विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदाबाबत निर्णय घेण्यास नकार दिला असून, हा निर्णय आता मनपा आयुक्तांना घ्यायचा आहे. त्यामुळे मनपा आयुक्त भाजपचा अधिकृत गटनेता म्हणून भगत बालाणी किंवा ॲड. दिलीप पोकळे यांच्यापैकी कोणाची नियुक्ती करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

५ सदस्यांची नियुक्ती करूनही भाजपला बहुमत मिळणे कठीण

स्थायीमध्ये एकूण १६ जागा असून, आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. यामध्ये बंडखोर नगरसेवकांचे नवनाथ दारकुंडे, रेश्मा काळे, प्रतीभा देशमुख यांचा समावेश आहे. तर भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, मुकुंदा सोनवणे, शिवसेनेचे नितीन लढ्ढा व नितीन बरडे तर एमआयएमचे शेख सईदा युसूफ या निवृत्त होणार आहे. नव्याने नियुक्ती करण्याचे अधिकार पक्षाच्या गटनेत्यांना राहणार आहे. भाजपकडे गटनेतेपद कायम राहिले, तर भाजपकडून नवीन ५ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे भाजपकडे स्थायी समितीत ७ सदस्य होणार आहेत. तर बंडखोर व शिवसेनेचे मिळून ८ व एमआयएम मिळून १ असे ९ सदस्य राहणार आहेत. त्यामुळे ५ सदस्यांची नियुक्ती झाली तरी भाजपला बहुमतासाठी दोन मते कमी पडण्याची शक्यता आहे.

बाविस्करांचे नाव आघाडीवर, खडके यांना धक्का ?

स्थायी समिती सभापतीपदासाठी बंडखोर नगरसेवकांमधून किशोर बाविस्कर यांचे नाव आघाडीवर असून, सुनील खडके यांच्या नावाला काही जणांचा विरोध असल्याने त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपमध्येही अनेकजण इच्छुक असले तरी गटनेतेपदाचा निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Opportunity for rebels from Sena for Standing Committee Chairman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.