विद्यार्थ्यांनी घरी बसून नावीण्यपूर्ण संशोधन करण्याची संधी -डॉ.मंजूषा क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 02:33 PM2020-09-21T14:33:04+5:302020-09-21T14:33:18+5:30
भुसावळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत. या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे. ...
भुसावळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत. या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांकडे संशोधनात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘चला मुलांनो, प्रयोग करूया’ या कार्यक्रमाचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जालना येथील टिकारीया सायन्स सेंटरचे प्रमुख संजय टिकारीया होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट रोटरी ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, डिस्ट्रिक्ट रोटरी ३०३०चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा उपस्थित होते.
इन्स्पायर वारियर बना
कोरोना विरुद्ध अनेक जण लढत आहेत. त्यांना कोरोना योद्धा म्हटले जाते परंतु या काळातदेखील शिक्षण सुरू राहावे यासाठी अनेक जण धडपडत आहेत आणि ते खºया अर्थाने लिटरसी वारियर म्हणून त्यांना संबोधता येईल. विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यशाळेचा लाभ घेऊन इन्स्पायर वारियर झाले पाहिजे.
सूत्रसंचालन जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे यांनी, तर आभार रोटरी क्लब चे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंस,े प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन, प्रदीप सोनवण,े समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले.