उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुध्द गुन्हा

By admin | Published: March 23, 2017 12:12 AM2017-03-23T00:12:09+5:302017-03-23T00:12:09+5:30

जळगाव : उघडय़ावर शौचास बसणा:या सालारनगर, खेडी, हरिविठ्ठल नगर तसेच पिंप्राळयातील 19 जणांवर जणांविरुध्द मनपाच्या गुडमॉर्निग पथकाने बुधवारी कारवाई केली.

Opposite to blame: crime against them | उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुध्द गुन्हा

उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुध्द गुन्हा

Next


जळगाव : उघडय़ावर शौचास बसणा:या सालारनगर, खेडी, हरिविठ्ठल नगर तसेच पिंप्राळयातील  19 जणांवर  जणांविरुध्द मनपाच्या गुडमॉर्निग पथकाने बुधवारी कारवाई  केली. एमआयडीसी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 200 रुपयांचा दंड करून त्यांची मुक्तता केली.तर रामानंद नगर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.  या कारवाई सत्राने उघडय़ावर शौचास बसणा:यांचे धाबेदणाणले असून ही कारवाई सुरूच रहाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव महानगरपालिकेतर्फे उघडय़ावर शौचालयास बसणा:यांविरुध्द कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  त्याअंतर्गत  मनपा आरोग्य निरीक्षक एन.ई.लोखंडे यांच्या पथकाने बुधवारी सकाळी साडे सात वाजता मोहीम राबविली. युनिट क्रमांक 13 मधील सालारनगर पुलाजवळ तसेच खेडी गावालगत  12 जण उघडय़ावर शौचास बसलेले आढळून आले. या सर्वाना टमरेलसह पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
यांच्यावर गुन्हा दाखल
बाबुराव मगन पांचाळ (वय 33), ज्ञानेश्वर एकनाथ पांचाळ (वय 26 ), नीलेश सुकदेव कदम (वय 39), मन्साराम झांबर मराठे (वय 38), शंकर बादल राठोड (वय 31), सोमवीर कश्यप (वय 25), बंटी श्रीराम कश्यप (वय 26),  भास्कर शिवलाल घाटोळे (वय 58), मधुकर भगवान इंधे (वय 46), आत्माराम कौतिक साळुंखे (वय 65), अरुण वसंत भालेराव (वय 42), प्रवीण सुरेश राऊत (वय 24) यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115,117 नुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. पैकी बाबुराव मगन पांचाळ (वय 33), ज्ञानेश्वर एकनाथ पांचाळ (वय 26 ), आत्माराम कौतिक साळुंखे (वय 65) हे तिघे न्यायालयात हजर झाले नसून गुरुवारी हजर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुडमॉर्निग पथकाची कारवाई
मनपाचे आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक जे.के. किरंगे, नंदू साळुंखे, के.के. बडगुजर, एन.ई. लोखंडे, मुकादम राजेंद्र निळे, बबन सोनवणे यांच्या गुडमॉर्निग पथकाने सकाळी 6 वाजेच्या सुमारास हगणदरी असलेल्या भागांमधून फेरफटका मारला असता इच्छादेवी ते खेडी पेट्रोलपंपादरम्यान मिल्लत शाळेजवळील नाल्याकाठी दोन जण तर खेडी पेट्रोलपंपाजवळ 12 जण          उघडय़ावर शौचास बसलेले आढळून आले. या  पथकाने तातडीने एमआयडीसी पोलिसांना बोलावून  या उघडय़ावर बसणा:यांना पोलिसांच्या ताब्यात        दिले.
गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ
रामानंदनगर परिसरात आरोग्य निरीक्षक यु.आर. इंगळे यांच्यासह भूपेंद्र भावसार, दीपक भावसार, एस.पी. अत्तरदे, एल.बी. धांडे यांच्या गुडमॉर्निग पथकाने हरिविठ्ठल परिसरात उघडय़ावर शौचास बसलेल्या दोघांना तसेच पिंप्राळा परिसरात चौघांना पकडून रामानंदनगर पोलिसांत आणले. रामानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ   केली. पोलीस निरीक्षक वाडीले  हे बाहेर गेलेले असल्याचे कारण दिल्याने हे पथक बसून होते. कारवाई केलेल्या सहा जणांची नावे व पत्ते पोलिसांना देण्यात आली मात्र सायंकाळर्पयत कारवाई झाली नव्हती.


स्थायी समितीमधील टिकेनंतर कारवाईसत्र

मनपा प्रशासनाकडून शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रय} सुरू आहेत. त्यासाठी सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यापासून ते तेथे पाण्याची, पथदिव्यांची व्यवस्था करण्यार्पयत सोय करण्यात येत आहे. शहरात 56 हगणदरी असून ही सर्व ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच हगणदरीमुक्तीच्या पाहणीसाठी शासनाला समिती पाठविण्याचे पत्रही दिले आहे. असे असताना शहरात काही ठिकाणी नागरिक उघडय़ावर बसत असल्याची टीका होत होती. स्थायी समितीच्या सभेत तर सदस्यांनीच याबाबत तक्रार करीत हगणदरीमुक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने उघडय़ावर बसणा:यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आरोग्याधिका:यांनी मिल्लत हायस्कूलजवळील नाल्याकाठी उघडय़ावर शौचास बसलेल्या दोघांना पकडून पोलीस स्टेशनला नेले होते. त्यांना तासभर बसवून ठेवत ताकीद देऊन सोडण्यात आले होते. त्यानंतर सरळ गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी सकाळी धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे उघडय़ावर शौचास बसणा:यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Opposite to blame: crime against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.