नागरिकत्व विधेयकाविरोधात मुक्ताईनगर येथे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 07:59 PM2019-12-16T19:59:25+5:302019-12-16T19:59:41+5:30
नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा व संविधान बचाओ देश बचाओ या संघटना व तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे पाठिंबा देण्यात आला. हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव या मोर्चात सामील झाले होते.
निवेदन निवासी नायब तहसीलदार नितीन झांबरे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना देण्यात आले. याप्रसंगी अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहमद हुसेनखान आमीर, मणियार बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जाफरअली, आसिफ खान, बहुजन क्रांति मोर्चाचे जिल्हा संयोजक, राजू खरे, नितीन गाळे, शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान, जाफरअली, शकूर जमादार, शकील, आसिफ खान, शकील मेंबर, मुशीर मण्यार, रौफ खान, युनूस खान, आरिफ आजाद, मस्तान कुरेशी, अहेमद ठेकेदार, शहरातील सर्व मशिदींचे मौलाना तसेच अल्तमश तालिब, नाजीम आदी सहभागी झाले. मोर्चा यशस्वीसाठी जुबेरअली, अकिल शेख, रिजवान चौधरी, इरफान बागवान, सादिक खाटीक, जवकीर जमादार, इम्रानखान, दाऊदखान यांनी प्रयत्न केले.