सहस्त्रलिंग येथे कव्वालीच्या कार्यक्रमात परस्पर विरोधकांनी मांडीवर दंड ठोकून आव्हान दिल्याने जबर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:57 PM2020-01-05T23:57:57+5:302020-01-05T23:59:40+5:30

सहस्त्रलिंग येथील मशीद चौकात कव्वालीच्या कार्यक्रमात पूर्ववैमनस्यातून एकाच समाजातील दोन गटांतील दोन जणांनी एकमेकांना मांडीवर दंड थोपटून पाहून घेण्याची धमकी दिल्याची खुन्नस काढण्यासाठी दोन्ही गटांनी बेदम मारहाण केली.

Opposition in Kavali's program at Sahastralinga challenged by opposition | सहस्त्रलिंग येथे कव्वालीच्या कार्यक्रमात परस्पर विरोधकांनी मांडीवर दंड ठोकून आव्हान दिल्याने जबर हाणामारी

सहस्त्रलिंग येथे कव्वालीच्या कार्यक्रमात परस्पर विरोधकांनी मांडीवर दंड ठोकून आव्हान दिल्याने जबर हाणामारी

Next
ठळक मुद्देएका गटाचे तीन जण तर दुसऱ्या गटाचे चार जण जखमीदुसºया गटातील १७ जणांविरुद्ध तर पहिल्या गटाच्या १६ जणांविरुद्ध दंगलीचे दोन गुन्हे दाखल

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सहस्त्रलिंग येथील मशीद चौकात ३ जानेवारी रोजी रात्री झालेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात पूर्ववैमनस्यातून एकाच समाजातील दोन गटांतील दोन जणांनी एकमेकांना मांडीवर दंड थोपटून पाहून घेण्याची धमकी दिल्याची खुन्नस काढण्यासाठी रविवारी सकाळी साडेसातला दोन्ही गटांनी दगडफेक करून व लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दोन्ही गटांचे सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, परस्परविरोधी फिर्यादीवरून रावेर पोलिसात एका गटाच्या १८ जणांविरुद्ध, तर दुसºया गटाच्या १७ जणांविरुद्ध दंगलीचा गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सहस्त्रलिंग येथील मशीद चौकात शुक्रवारी रात्री झालेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात आरोपी ईरफान नबाब तडवी याने पूर्ववैमनस्यातून मांडीवर बुक थोपवून पाहून घेईन, अशी धमकी दिली होती. त्यांच्यासह आरोपी सलीम नशीर तडवी, गफार सलीम तडवी, याकुब नशीर तडवी, फरीद नशीर तडवी, शब्बीर नशीर तडवी, गुलशेर मकबूल तडवी, मजीत निजाम तडवी, युनूस सिकंदर तडवी, हबीब नथ्थू तडवी, भिकारी उस्मान तडवी, अरमान महेबूब तडवी हमीद इब्राईम तडवी, आयुब हबीब तडवी, लुकमान ईस्माईल तडवी, अशपाक अरमान तडवी, कलीम अरमान तडवी, कलीम सलीम तडवी, इरफान नबाब तडवी (सर्व रा.सहस्त्रलींग, ता.रावेर) यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन बेदम मारहाण करून व दगडफेक करून छबू दगडू तडवी व त्यांचा मुलगा सिकंदर यांचे डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी छबू दगडू तडवी यांच्या फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेश्र यातील १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी जखमी झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेंद्र राठोड करीत आहेत.
तद्वतच, कव्वालीच्या कार्यक्रमात आरोपी जहांगीर शब्बीर तडवी याने इरफान नवाब तडवी यास शिवीगाळ करून वादविवाद करत ५ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी जावेद शब्बीर तडवी, सलीम सुलेमान तडवी, शब्बीर गंभीर तडवी, लतीफ दगडू तडवी, छबू दगडू तडवी, सुलेमान अंजीर तडवी, लुकमान अंजीर तडवी, संजय कासम तडवी, युनूस शब्बीर तडवी, रमजान उस्मान तडवी, खलील सिकंदर तडवी, आयुब जुम्मा तडवी, मुबारक नत्थू तडवी, सिकंदर सरदार तडवी, लुकमान रहेमान तडवी, अरमान उस्मान तडवी, सिकंदर छबू तडवी व जहांगीर शब्बीर तडवी यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी सलीम नशीर तडवी, त्याचा भाऊ शब्बीर नशीर तडवी व चुलतभाऊ लुकमान ईस्माईल तडवी यांच्या डोक्यात गंभीर मार बसल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १८ पैकी १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास फौजदार मनोज वाघमारे करीत आहेत.
दरम्यान, सहस्त्रलिंग येथे दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आले असून, बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, दोन्ही गटाच्या २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सायंकाळी सहस्त्रलिंग गावातून रुटमार्च काढला.

Web Title: Opposition in Kavali's program at Sahastralinga challenged by opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.