विरोधी पक्षनेता म्हणूनच जास्त परिचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:30 PM2019-12-02T20:30:17+5:302019-12-02T20:30:33+5:30
खडसे : विधानसभेत नसल्याची खंत
जळगाव : मंत्रीपदापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम लोकांच्या अधिक लक्षात आहे़ पाच वर्ष जनतेसाठी सातत्याने अभ्यासपूर्ण असे प्रश्न मांडल्याने त्याची पोच रविवारी विधानसभेत नेत्यांकडून मिळाली, असे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले़ विधानसभेत मी नसल्याची खंत आताच्या सत्ताधाऱ्यांना आहे, तशी ती मलाही असल्याचे ते म्हणाले़
जळगावात त्यांच्या निवासस्थानी त्यांनी संवाद साधला मात्र, आता काही बोलण्याची वेळ नाही, असे सांगत त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले़ मंत्री बाळसाहेब थोरात व जयंत पाटील यांनी रविवारी विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विरोधीपक्षात असताना केलेल्या कामगिरीचे कौतुक केले़ याबद्दल त्यांना विचारले असता, आपण पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण अशी जी विरोधी पक्षनेता म्हणून छाप सोडली होती त्याची पावती दोघांकडून मिळाली़ देवेंद्र फडणवीस यांनी त्या पद्धतीने किंबहूना त्यापेक्षा सरस काम करावे, अशी अपेक्षा त्यांची असेल, असे खडसे म्हणाले़
दरम्यान, एका लग्नपत्रिकेवर आधी माजी विरोधी पक्षनेता म्हणून उल्लेख आल्याने मंत्री म्हणून काय केले ते नाही पण विरोधीपक्षनेता होत, हे लोकांच्या अधिक लक्षात असल्याचा टोला त्यांनी लगावला़ आता नातू सांभाळत बसलो आहे, असेही ते म्हणाले. दाखविली़ विरोधी पक्षनेता हा अभ्यासू असावा जनतेच्या प्रश्नावर त्याने तडजोड करायला नको, असेही ते म्हणाले़ दरम्यान, आपण कुठलेही पक्षांतर करणार नाही, हे आधीच स्पष्ट केल्याचे सांगत त्यांनी पक्षांतरांच्या चर्चा फेटाळल्या़