दारु दुकानांना विरोध, बोदवड नगरपंचायतीवर महिलांचा मोर्चा
By admin | Published: May 11, 2017 02:21 PM2017-05-11T14:21:05+5:302017-05-11T14:21:05+5:30
मुख्याधिका:यांना नगरसेवकांचा घेराव
Next
बोदवड, जि़जळगाव,दि.11- नगरपंचायतीने भरवस्तीत दारू दुकान सुरू करण्यासह नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने संतप्त नागरिकांसह महिलांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नगरपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला़
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरातील सर्व दारू दुकाने बंद झाल्यानंतर नवीन दुकान टाकण्यासाठी एका व्यावायिकाने नगरपंचायतीला अर्ज दिला होता़ मुख्याधिकारी डॉ़नीलेश देशमुख यांनी मात्र नाहरकत दाखला दिल्यानंतर 1 मे पासून भर वस्तीत दारू दुकान सुरू झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला़
गुरुवार, 11 रोजी मासिक सभा असल्याने नागरिकांनी स्वामी विवेकानंद नगरापासून भर उन्हात पायी मोर्चा नगरपंचायतीवर आणला़ मुख्याधिकारी डॉ़नीलेश देशमुख हे बाहेर येऊन निवेदन घेण्यास नकार देत असल्याने मोर्चेकरी अधिक संतप्त झाल़े प्रसंगी सर्व नगरसेवकांनी त्यांना त्यांच्या दालनात घेराव घातला व निवेदन घेण्यास भाग पाडला़ विशेष म्हणजे दारूबंदीला शहरातील सर्व 17 सदस्यांनी समर्थन दिले आह़े
आंदोलनात नंदाबाई श्याम भोपळे, सुनीता सोनाजी चंदनकर, मंगलाबाई गंभीर कान्हे, शुभ्रा कदीर मन्यार, कमल अशोक माळी , ज्योती दीपक मराठे यांच्यासह शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या़