गळत्यांचा मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:26 AM2019-02-06T11:26:12+5:302019-02-06T11:26:19+5:30
पाणी टंचाई निर्माण झाल्यास मनपाच जबाबदार
जळगाव : शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनींना असणाºया गळत्यांचा मुद्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपासह विरोधी शिवसेनेने देखील मनपा प्रशासनाला धारेवर धरले. स्थायी समितीत सर्वच सदस्यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत गळत्यांचा गंभीर प्रश्नाकडे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण होईल व या टंचाईला केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला.
अनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मनपाच्या पाईपलाईनीस गळत्या सुरु आहेत. याबाबत ‘लोकमत’ ने दोन दिवसांपासून नागरिकांकडून शहरातील गळत्यांबाबतची माहिती मिळवली असता, शहरात गल्लोगल्लीत असलेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही भवायह स्थिती ‘लोकमत’ ने उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत देखील याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले.
शहर अभियंता खडकेंना गळत्यांची संख्याच माहिती नाही
शहरातील विविध भागात असलेल्या गळत्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी शहर अभियंता यांना शहरात किती गळत्या आहेत? याबाबतची माहिती मागितली. मात्र, खडके यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
त्यावर विष्णू भंगाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, जे काम मनपाने करायला हवे होते. ते काम ‘लोकमत’ ने केले. तसेच सर्व गळत्यांची माहिती ‘लोकमत’ ने आपल्यापर्यंत पोहचवल्यानंतरही जर मनपाकडून कारवाई होत नसेल तर भविष्यात शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्याला केवळ मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.
सर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?
मनपा पाणी पुरवठा विभागाकडे व्हॉल्व्हमॅन, कर्मचारी व इतर सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरी गळत्या रोखण्यात अपयश का येत आहे ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. ‘लोकमत’ ने शहरातील गळत्या लक्षात आणून दिल्या असतील तर त्या गळत्या रोखण्याची जबाबदार मनपा पाणी पुरवठा विभागाची असल्याचेही लढ्ढा म्हणाले. हिवाळ्यातील चार महिन्यात धरणातील १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, आता केवळ ३० टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात भिषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मनपाने गळत्यांची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी लढ्ढा यांनी केली.
धडक मोहीम राबवा - जितेंद्र मराठे
शहरातील गळत्यांबाबत लोकमतने १० जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर रायपूर, कंडारी या ठिकाणच्या मोठ्या गळत्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सभेत दिली. तसेच आता शहरातील ज्या भागात लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्त करण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा सूचना मराठे यांनी मनपा पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
उपमहापौरांनीही दिले आदेश... ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सकाळी १० वाजता मनपा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांना आपल्या दालनात बोलावून घेत सर्व गळत्यांबाबतचा आढावा घेतला. तसेच ‘लोकमत’ ने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व गळत्या दुरुस्त करण्याचे आदेश उपमहापौरांनी खडके यांना दिले. दोन दिवसात सर्व गळत्या दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन खडके यांनी उपमहापौरांनी दिले. याबाबत दोन दिवसात आपण परत आढावा घेणार असल्याचेही उपमहापौरांनी खडके यांना सांगितले. ‘लोकमत’ कडून नागरिकांच्या मदतीने