गोटे विरोधकांना भाजपात खुर्ची!

By admin | Published: April 27, 2017 12:35 AM2017-04-27T00:35:56+5:302017-04-27T00:35:56+5:30

विविध पक्षांचे सात नगरसेवक भाजपामध्ये

Opposition parties in BJP chair! | गोटे विरोधकांना भाजपात खुर्ची!

गोटे विरोधकांना भाजपात खुर्ची!

Next

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सोनल शिंदे यांच्यासह सात जणांना बुधवारी पुण्यात भाजपात प्रवेश देण्यात आला़ भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला़  यामुळे आमदार अनिल गोटे यांचा विरोध डावलून       त्यांच्या विरोधकांना भाजपमध्ये स्थान देण्यात आल्याची राजकीय वतरुळात चर्चा         आहे.
महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग़्रेसच्या नगरसेवकांना भाजपात प्रवेश न देता स्वपक्षीयांनाच बळ द्यावे असा सूर आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पक्षाच्या बैठकीत आळवला होता. परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या सात जणांनी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला़
यानिमित्ताने भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत़ माजी उपमहापौर फारूख शाह हे  गेल्या वर्षी आमदार अनिल गोटेंच्या विरोधात पुढे आल्याने बरेच वादविवाद झाले होत़े शिवाय शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदार गोटेंविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या धरणे आंदोलनातदेखील फारूख शाह सहभागी झाले होत़े अजूनही सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वपक्षीय पदाधिका:यांचा प्रवेश
 भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये  महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा  राष्ट्रवादीचे नगरसेवक सोनल शिंदे, माजी उपमहापौर फारूख शाह, माजी महिला व बालकल्याण सभापती जुलाहा रश्मीबानो, अपक्ष  नगरसेवक फिरोज लाला, शिवसेना पुरस्कृत नगरसेविका शकुंतला जाधव, माजी नगरसेवक भिकन वराडे व सुनील पाटील यांचा समावेश आहे. यापैकी वराडे व पाटील वगळता इतर पाच जण विद्यमान नगरसेवक आहेत.

Web Title: Opposition parties in BJP chair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.