केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:01+5:302021-05-28T04:13:01+5:30
अमळनेर तालुक्यात १५,३३१ एपीएल कार्डधारक शिधापत्रिका असून या योजनेतील लाभार्थ्यांची एकूण ६१,९७७ एवढी सदस्य संख्या आहे. या योजनेची प्रथम ...
अमळनेर तालुक्यात १५,३३१ एपीएल कार्डधारक शिधापत्रिका असून या योजनेतील लाभार्थ्यांची एकूण ६१,९७७ एवढी सदस्य संख्या आहे. या योजनेची प्रथम मागणी करणाऱ्यास देणे या तत्वावर हे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ व पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले आहे. योजनेचा लाभ प्रत्येक एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
सर्व एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य माहे जून करिता सवलतीच्या दराने दिला जाणार आहे. त्यानुसार गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो वितरण करण्याची सूचना रेशन दुकानदारांना करण्यात आलेली आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ व पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले आहे.