जळगावच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर पुन्हा डॉ.भामरेंच्या नियुक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:02 PM2018-02-01T22:02:21+5:302018-02-01T22:03:45+5:30
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांची झालेली बदली ‘मॅट’ने बेकायदा ठरवत पुन्हा त्यांना जळगावला नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना पंधरा दिवसात इतरत्र नियुक्ती देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. दरम्यान, ‘मॅट’च्या आदेशाबाबत डॉ.चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १ - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांची झालेली बदली ‘मॅट’ने बेकायदा ठरवत पुन्हा त्यांना जळगावला नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना पंधरा दिवसात इतरत्र नियुक्ती देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. दरम्यान, ‘मॅट’च्या आदेशाबाबत डॉ.चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने मुदतपूर्व किंवा नियमबाह्य केलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदली प्रकरणी मॅट न्यायालयाने गेल्या महिन्यात ‘जैसै थे’ चे आदेश दिले होते. त्यात धुळे येथील शल्यचिकित्सक डॉ.एम.पी.सांगळे यांचीही पुन्हा आपल्या पूर्वीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने एकाच वेळी जळगाव, धुळे, अहमदनगर व अन्य काही जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात अहमदनगर, धुळे व जळगाव येथील शल्य चिकित्सकांच्या बदल्या या मुदतीपूर्व झाल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शल्यचिकित्सकांनी मॅट न्यायालयात धाव घेतली होती.