जामनेरच्या बीडीओंच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:41 PM2018-06-30T12:41:03+5:302018-06-30T12:42:59+5:30

जलव्यवस्थापन समितीची बैठक

The order of BDO inquiry | जामनेरच्या बीडीओंच्या चौकशीचे आदेश

जामनेरच्या बीडीओंच्या चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देविहिरीसाठी ५० हजाराची मागणी केल्याचा आरोपबीडीओंना हजर राहण्याचे आदेश

जळगाव : जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे शेतामध्ये सिंचन विहिरीच्या कार्यारंभ आदेशासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारीनुसार जामनेरचे गटविकास अधिकारी ए.बी. जोशी यांच्या चौकशीचे आदेश जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिले.
जि.प.च्या साने गुरुजी सभागृहात जलव्यस्थापन समितीची सभा शुक्रवारी झाली. याप्रसंगी अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, संजय मस्कर, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, जि.प. सदस्य लालचंद पाटील, पवन सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यात सिंचन विहिरींप्रकरणी तक्रारी वाढत असून जामनेर तालुक्यातील भारूडखेडा येथील अल्प भूधारक शेतकरी भगतसिंग पाटील यांनी शेतामध्ये सिंचन विहिरीसाठी ग्रामसभेमार्फत २०१६ मध्ये पंचायत समितीकडे अर्ज केला होता. सर्व पात्रता, अटी पूर्ण केल्याने विहीर मंजूर होवून मे २०१७ मध्ये पंचायत समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र बीडीओ ए.बी. जोशी यांनी पैशांची मागणीसाठी कार्यरंभ आदेश देण्यास नकार देत आहे. या बाबत सदस्य लालचंद पाटील यांनी सभेत प्रश्न मांडून गट विकास अधिकारी जोशी यांची चौकशी करण्याची मागणी केली.
बीडीओंना हजर राहण्याचे आदेश
हा मुद्दा जि.प. सदस्य लालचंद पाटील यांनी जलव्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून दिला. याबाबत अध्यक्षांनी संजय मस्कर यांना चौकशीचे आदेश दिले असून बीडीओ जोशी यांना ३० रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीईओंनी दिली प्रशासकीय मान्यता
सीईओ शिवाजी दिवेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समितीने वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच बीडीओ जोशी यांचा पंचनामा खोटा असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. या अहवालानुसार सीईओ यांनी बीडीओंचा आदेश रद्द करून मूळ प्रशासकीय मान्यता कायम ठेवली आहे.
शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा
बीडीओ जोशी यांच्यासह पंचायत समितीमधील यंत्रणेने तालुक्यातील अन्य शेतकºयांकडूनदेखील पैसे उकळले आहे. यात शेतकºयांचा मानसिक छळ केला जात असून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंचायत समितीसमोर आत्मदहन करेल असा इशारा भरतसिंग पाटील यांनी दिला आहे.

Web Title: The order of BDO inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.