आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश
By Admin | Published: January 21, 2017 12:32 AM2017-01-21T00:32:32+5:302017-01-21T00:32:32+5:30
न्यायालय : राष्टÑवादी तालुकाध्यक्षाचा समावेश
चाळीसगाव : अॅट्रॉसिटी गुन्हयाच्या साक्षीदारास तलवारीने वार केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश चाळीसगाव न्यायालयाने दिले आहे.
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याचा राग येऊन देवीदास पंडित पाटील रा. बोरखेडे बुद्रूक यास तलवारीचा वार करुन बेदम मारहाण केल्या प्रकरणात मेहुणबारे पोलिसांनी जामीनपात्र कलम लावल्याने फिर्यादी देवीदास पाटील यांनी चाळीसगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.
त्यावर न्यायालयाने दिनेश साहेबराव पाटील, किशोर भगवान पाटील, शशिकांत रामराव पाटील, सुभाष उर्फ बापू त्र्यंबक पाटील, नंदू साहेबराव पाटील, किशोर शिवाजी पाटील, अनिल पंडित पाटील, करण अनिल पाटील सर्व रा. बोराडखेडे बुद्रूक यांच्याविरुद्ध कलम १५३ (३) नुसार भा.दं.वि. कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०४ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयात अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.