चौकशीचे आदेश!

By Admin | Published: March 27, 2017 11:50 PM2017-03-27T23:50:55+5:302017-03-27T23:50:55+5:30

गुदमरून मृत्यूप्रकरणी पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट : घातपाताचा संशय, ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासण्याची भक्तगण व भावंडांची मागणी

Order of inquiry! | चौकशीचे आदेश!

चौकशीचे आदेश!

googlenewsNext

धुळे : शहरातील अकबर चौकातील घराला आग लागल्यामुळे रविवारी पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू  झाल्याप्रकरणी घटनास्थळाजवळ असलेल्या ‘सीसीटीव्ही फुटेज’ची तपासणी करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. या फुटेजमध्ये घटनेवेळी दोन संशयित घराभोवती घुटमळत असल्याचे दिसत असल्याने घातपाताचा संशय आहे. त्यानुसार पालकमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़
 पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी घटनास्थळी  भेट दिली़ या वेळी मृतांचे नातेवाईक व दक्षिणमुखी मारुती मंदिरातील भक्तगणांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे ही मागणी केली.
 या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, प्रा़शरद पाटील, अतुल सोनवणे, पंकज गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े
निवेदनाद्वारे मागणी
पालकमंत्री दादा भुसे यांनी घराची आत जाऊन पाहणी केली़ त्यानंतर राम शर्मा यांचे बंधू हेमंत शर्मा, श्याम शर्मा यांच्यासह दक्षिणमुखी मारुती मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगणांनी आगीच्या घटनेची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली़ त्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, राम शर्मा यांच्या घराजवळ खासगी व्यावसायिकाचे सीसीटीव्ही असून त्यांच्या फुटेजची तपासणी केली असता दोन व्यक्ती दिसून येत आहेत़ या आग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़  निवेदनावर ज़ेबी़राणा, नितीन चौधरी, गोवर्धन गुजर, गणेश सोनार, दिगंबर कासार, राहुल ठोकळ, सुंदर गुजर, धीरज परदेशी, रमेश चौधरी व अन्य नागरिकांच्या स्वाक्ष:या आहेत़
नमुने तपासणीतून होईल स्पष्टता
घराला आग लागल्याची घटना घडल्यानंतर न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतर्फे घटनास्थळावरून नमुने घेण्यात आले आहेत़ त्या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आह़े मात्र दुसरीकडे परिसरातील नागरिकांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत़
असे आहेत तर्कवितर्क
आगीच्या घटनेत मृत्यू झालेले राम शर्मा यांनी शनिवारी मध्यरात्रीच दक्षिणमुखी मारुती मंदिरातील काही जणांना आपला आज अखेरचा दिवस असल्याचे संकेत दिले होते. शर्मा यांच्या मालमत्तेचा वाद सुरू होता, परिसरातील एका व्यावसायिकाकडून शर्मा यांचे घर खरेदी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता, त्यामुळे त्यांनी आपल्याच वाहनातील पेट्रोल काढून घर पेटवून घेत आत्महत्या केली़ शर्मा यांना स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव वाचविणे सहज शक्य झाले असते; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक तसे करणे टाळले असे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत़ त्याचप्रमाणे शर्मा यांनी चुकून सिलिेडरचे बटन सुरू ठेवल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पोलिसांचा शॉर्ट सर्किटचा अंदाज आह़े
घटनास्थळी दिवसभर सन्नाटा!
आगीच्या घटनेनंतर दुस:या दिवशी परिसरात सन्नाटा होता़  घराच्या आजूबाजूला बॅरिकेडस् लावण्यात आले होत़े अनेक नागरिक जळालेले घर पाहून हळहळ व्यक्त करीत होत़े
भडका होताच एक पसार
या दोन व्यक्ती घटनास्थळापासून अकबर चौकाकडे जाऊन पंचायत मस्जिदसमोरून वळसा घालून लांब अंतरावरून घटनास्थळाकडे पाहत असल्याचे दिसून येत आह़े त्यापैकी एक जण आगीचा भडका होताच पसार होत असल्याचे व दुसरा घटनास्थळाकडून जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे या अनोळखी इसमांवर संशय आहे.

Web Title: Order of inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.