मालती नेहतेंच्या वारसांना ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:42+5:302021-02-05T05:51:42+5:30
जळगाव : भुसावळ येथील मालती नेहते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी व न्या. ...
जळगाव : भुसावळ येथील मालती नेहते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी व न्या. एस.व्ही.गंगापूरवाला यांनी गुरुवारी निकाल देताना जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा आढळून आल्याने नेहते यांच्या वारसांना पाच लाखांची नुकसान भरपाई निकाल लागल्यापासून चार महिन्यात शासनाने अदा करावी असा निर्णय दिला आहे.
मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले होते़ कोरोना काळात जळगाव जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या मालती नेहते (८२, रा. भुसावळ) या २ जून २०२० रोजी रूग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर १० जूनला नेहते यांचा रूग्णालयातील स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आला होता. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.