ओझे कमी करण्याचे आदेश ‘दप्तरात’ गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:58 PM2018-12-11T16:58:01+5:302018-12-11T16:59:31+5:30

अमळनेर शहरातील विविध शाळांमध्ये ‘लोकमत’ने अचानक केलेल्या सर्वेक्षणात किरकोळ अपवाद वगळता सर्वच विद्यार्थ्यांजवळ क्षमतेपेक्षा जादा वजनाची दप्तरे आढळून आलीत, अनेक शाळांना शासनाच्या ओझे कमी करण्याच्या आदेशाची माहितीच नाही असे दिसून आले.

The order to reduce the burden was wrapped in 'Dapatra' | ओझे कमी करण्याचे आदेश ‘दप्तरात’ गुंडाळले

ओझे कमी करण्याचे आदेश ‘दप्तरात’ गुंडाळले

Next
ठळक मुद्देअमळनेर : शाळा, पालक अनभिज्ञ, पुस्तकांचे वजन आधीपेक्षा जास्त वाढले‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनअनेक शाळांना शासनाच्या ओझे कमी करण्याच्या आदेशाची माहितीच नाही असे दिसून आले.


संजत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर, जि.जळगाव : शहरातील विविध शाळांमध्ये ‘लोकमत’ने अचानक केलेल्या सर्वेक्षणात किरकोळ अपवाद वगळता सर्वच विद्यार्थ्यांजवळ क्षमतेपेक्षा जादा वजनाची दप्तरे आढळून आलीत, अनेक शाळांना शासनाच्या ओझे कमी करण्याच्या आदेशाची माहितीच नाही असे दिसून आले.
‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील विविध शाळांमध्ये भेटी देऊन पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांसमोर दप्तराचे वजन केले असता शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा एक ते तीन किलोने जास्त वजन आढळून आले. काहींच्या जेवणाचा डबा व पाण्याची बाटली बाजूला ठेवली तरी वजन जास्त भरले. काही विद्यार्थी सर्वच वह्या पुस्तके सोबत आणत असल्याने दप्तराचे वजन पेलता येत नाही, याकडे शिक्षक पालक यांचे दुर्लक्ष होत आहे. स्पर्धेच्या नावाखाली अधिकाधिक वेगवेगळी पुस्तके मागवण्यात येतात आणि पालकदेखील हेव्यापोटी शाळा सांगेल तसे दप्तराचे ओझे मुलांवर लादतात.
जास्त वजनामुळे विद्यार्थी कंटाळतात, थकतात. त्यामुळे त्यांची मानसिकता खराब होऊन अध्ययनाकडे दुर्लक्ष होते. काहींना लहानपणीच पाठीचे त्रास उद्भवतात. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कुठेच झालेली दिसून येत नाही. अधूनमधून शाळा, शिक्षक, अधिकारी यांनी मुलांचे दप्तर तपासले पाहिजे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेले सर्वेक्षण आणि मुलांच्या दप्तराचे वजन पुढीलप्रमाणे-
एन.टी.मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल
रिया उमेश मनोरे ३री- ३.५ किलो, पूर्वशी संजय पाटील ४थी- ४.५ किलो, अवनिश नितीन पाटील १ली- ३.५ किलो
सानेगुरुजी प्राथमिक शाळा
मोईन शहा फिरोज शहा ४ थी- ३.५ किलो, मयुरी दीपक पाटील १ ली- २.७ किलो, कृष्णाली प्रदीप धनगर १ ली- ३.२ किलो.
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्पोर्ट डे असल्याने दप्तर कमी आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तरीदेखील अधिक प्रमाण आढळून आले तर नियमित दिवशी दप्तराचे वजन किती असेल ही चिंतेची बाब आहे.
ज्ञानेंद्र विनय बडगुजर ८ वी- ५ किलो जैद नवाजुद्दीन शेख ८ वी- ३.२ किलो, खुशाल पंकज कुलकर्णी ४थी- ४ किलो.
डी.आर.कन्याशाळा
प्रीती नरेश कल्याणी ७ वी- ५ किलो, दिव्यांनी संजय सैंदाणे ५ वी- ४.५ किलो.
पी.बी.ए. इंग्लिश मीडिअम स्कूल
यश योगेश भामरे १ली- ४.५ किलो
हिरा इंग्लिश मीडिअम स्कूल
नवाज सलीम पिंजारी ६ वी- ४.७ किलो,
न्यू व्हिजन इंग्लिश मीडिअम स्कूल
प्रशा विनोद पारख १ली- २.८ किलो असे आढळून आले

संबंधित शाळांना दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रप्रमुखांना अधून-मधून तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. खरोखर अंमलबाजवणी होऊन शाळांनी दप्तराचे बोझे कमी करावे.
-आर.डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

सरकारची योजना चांगली आहे. मात्र स्पर्धेच्या युगात अधिक अभ्यासक्रमाची पुस्तके मागवतो म्हणून दप्तराचे ओझे वाढते. मार्चमध्ये अभ्यासक्रम निश्चित केल्यामुळे पुस्तके कमी करता येणार नाहीत. मात्र आजच शिक्षकांची बैठक घेऊन तीन दिवस फक्त वर्कबुक मागवू. नंतरचे तीन दिवस वह्या पुस्तक मागवू आणि पुढील वर्षी शासन आदेशाची अंमलबाजवणी होईल.
-व्ही.लक्ष्मण, प्राचार्य, एन.टी.मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल

शाळांनी एकाच दिवशी वर्कबुक, टेक्स्टबुक आणि वह्या मागवू नये. दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे. मुलांची पाठ दुखते.
-शीतल चव्हाण, पालक, सेंट मेरी स्कूल

दप्तराचे ओझे जास्त राहिल्यास पाठीच्या कण्याला, मानला ताण पडून स्नायू कमजोर होतात. पाठीला वाक येतो. मानसिकता बिघडते व अभ्यासाला कंटाळतात. शाळांनी आॅडिओ, व्हीडिओ दाखवून पुस्तकविना ज्ञान द्यावे.
-डॉ.जी.एम.पाटील, बालरोगतज्ज्ञ, अमळनेर

दप्तराचे ओझे कमी करण्याचे कोणतेच आदेश आलेले नाहीत. सध्या पुस्तके मोठी झाली आहेत. अभ्यासक्रम नेमका करून पुस्तकांचे वजन कमी केले पाहिजे.
-खान अनिसा परवीन, मुख्याध्यापिका, अल्फाईज उर्दू स्कूल, अमळनेर

शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे आदेश दिल.े तसे अभ्यास मंडळालादेखील आदेश देऊन पुस्तकांची जाडी व वजन कमी करण्याच्या सूचना द्याव्यात. समन्वय साधल्यास अमलबाजवणी योग्य होईल.
-डी.ए.धनगर, शिक्षक, सानेगुरुजी शाळा
 

Web Title: The order to reduce the burden was wrapped in 'Dapatra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.