भुसावळ नगरपालिकेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश

By admin | Published: June 20, 2017 02:41 PM2017-06-20T14:41:25+5:302017-06-20T16:07:48+5:30

जिल्हाधिकाºयांची नगरपालिकेत भेट

Order of structural audit of Bhusaval Municipality building | भुसावळ नगरपालिकेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश

भुसावळ नगरपालिकेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश

Next

आॅनलाईन लोकमत

भुसावळ,दि.२०- नगरपालिकेची इमारत जीर्ण झाली असून तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करा अन्यथा शक्य झाल्यास इमारतीचे स्थलांतरीत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केल्या़ मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी अचानक पालिकेला भेट देऊन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली़ प्रसंगी घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात खाजन्सी एजन्सीतर्फे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले़ निंबाळकर यांनी संबंधित एजन्सीला प्लँटसाठी खर्च किती, आधी कुठे असा प्लँट उभारण्यात आला आहे का यासह विविध प्रश्नही विचारले़ 
नगराध्यक्षांनी ३० अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने अवघ्या नऊ अधिकाºयांवर कामे सुरू असल्याचे सांगत दखल घ्यावी, अशी विनंती केली़
पालिकेची ब्रिटीशकालीन इमारत जीर्ण झाल्याने तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करून १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिली़ प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, सतीश सोनवणे, गिरीश महाजन, रमाकांत पाटील, गिरीश महाजन, अ‍ॅड़बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, मुकेश पाटील, राजेंद्र आवटे, निकी बत्रा आदींची उपस्थिती होती़

Web Title: Order of structural audit of Bhusaval Municipality building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.