जेके पार्क ताब्यात घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:19 AM2021-03-09T04:19:16+5:302021-03-09T04:19:16+5:30
अस्वच्छतेबाबत तक्रारी आल्यास कारवाई करणार जळगाव - आरोग्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत आहे. घंटागाड्या नियमित येत नसून दररोज स्वच्छता होत ...
अस्वच्छतेबाबत तक्रारी आल्यास कारवाई करणार
जळगाव - आरोग्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत आहे. घंटागाड्या नियमित येत नसून दररोज स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिकांची ओरड होत आहे. त्यामुळे आपल्या कामात सुधारणा करावी. कमी मनुष्यबळाच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाही. कामगारांकडून सर्व शहरात नियमित साफसफाई करण्यात यावी, अशा सूचना आरोग्य समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी संबंधितांना दिल्या. आरोग्य समितीची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली या बैठकीत मराठे यांनी हे आदेश दिले. स्वच्छेतसंदर्भात तक्रारी वाढल्यास संबंधित प्रभागातील अधिकार्यांंवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सभापती जितेंद्र मराठे यांनी दिला.
आव्हाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १७ वर
जळगाव - कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असून शहरासह ग्रामीण भागात देखील ही संख्या वाढत आहे.जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे कोरोना रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे. आतापर्यंत गावात २०० हुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापौर निवडीची आजपासून प्रक्रिया
जळगाव - मनपाच्या महापाैर व उपमहापाैर निवडीसाठी मंगळवारपासून प्रक्रिया सुरू हाेत आहे. ९ ते १६ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नगरसचिव कार्यालयात नामनिर्देेशनपत्र घेता येणार आहेत. महापाैर भारती साेनवणे व उपमहापाैर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च राेजी संपणार आहे. मंगळवारपासून अर्ज घेण्याची सुरू हाेत आहे.