जिल्हा परिषदेत आता ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:30 PM2020-07-30T12:30:42+5:302020-07-30T12:32:12+5:30

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न ...

Order of 'Work from Home' in Zilla Parishad now | जिल्हा परिषदेत आता ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश

जिल्हा परिषदेत आता ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश

Next

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न येता वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून घरुनच कामकाज करण्याचे आदेश कोरोनाचे इन्सीडेंट कमांडर तथा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बुधवारी काढले आहेत.
दरम्यान, घरुन काम करताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून विभाग प्रमुखांनी अत्यावश्यक कामासाठी कार्यालयात बोलावल्यास कर्मचाºयांनी यावे असेही आदेशात म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण होत आहे. यावर संपर्क साखळी तोडण्यासाठी ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत आठवडाभर घरुनच कामकाज करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेत ५- ७ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी वर्क फ्रॉम होमच्या कुठल्याही सूचना नव्हत्या. आता बदल्यांच्यावेळी वेळी एवढी गर्दी झाली ही कर्मचाºयांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. याबद्दल अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Order of 'Work from Home' in Zilla Parishad now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.