चाचण्या वाढविण्याचे आदेश, मात्र एकाच लॅबवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:09 AM2021-02-22T04:09:56+5:302021-02-22T04:09:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात विशेषत: शहरात अधिक रुग्णवाढ गेल्या ...

Orders to increase tests, but load on a single lab | चाचण्या वाढविण्याचे आदेश, मात्र एकाच लॅबवर भार

चाचण्या वाढविण्याचे आदेश, मात्र एकाच लॅबवर भार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात विशेषत: शहरात अधिक रुग्णवाढ गेल्या आठवडाभरापासून समोर येत असताना आता चाचण्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. मात्र, यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एकाच तपासणी प्रयोगशाळेवर याचा भार येत असल्याने अहवालांना विलंब होत आहे.

रुग्णसंख्येच्या वीसपट चाचण्या करण्याचे आदेश आहेत. याचा अर्थ नियमित शंभर रुग्ण आढळून आल्यास किमान २००० चाचण्या होणे अपेक्षित आहेत. मात्र, जीएमसीतील प्रयोगशाळेतची क्षमता दिवसाला सरासरी ८०० स्वॅब तपासणीची आहे. त्यामुळे २००० चाचण्या नियमीत झाल्यास उर्वरित १२०० अहवाल प्रलंबित राहून पुढे हा आकडा वाढतच राहणार आहे. सद्यस्थितीत खासगी यंत्रणेची यात मदत घेतली जात नाही, एकमेव प्रयोगशाळेवर हा भार आहे. आरटीपीसीआरचे अहवाल येण्यास तीन दिवसांचा अवधी लागत आहे.

आठवडाभरात झालेल्या चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७४९ कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. यात गेल्या आठवडाभरात ६ हजार ८३८ चाचण्या झाल्या आहे. म्हणजे दिवसाला सरासरी ९३६ चाचण्या होत आहेत. हे प्रमाण वाढवून बाधितांना लवकर विलग करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. चाचण्या वाढल्या मात्र, प्रलंबित अहवालांची संख्याही ९४० वर गेलेली आहे. दिवसाला किमान पंधराशे चाचण्या करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून आधी सांगण्यात आले होते.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर प्रश्नचिन्ह

कोरेानाचा पुन्हा संसर्ग वाढण्यामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित होत नसल्याचे कारणही सांगितले जात आहे. आधी एका रुग्णामागे किमान ८ हायरिस्क कॉन्टॅक्टच्या तपासण्या होत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून याकडे तेवढ्या गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. कुटुंबिय वगळता अन्य हायरिस्क कॉन्टॅक्टची सद्यस्थितीत टेस्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय, असाही एक तर्क काढला जात आहे.

Web Title: Orders to increase tests, but load on a single lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.