आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा संप अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:40 PM2020-06-10T16:40:54+5:302020-06-10T16:42:04+5:30
आयुध निर्माणीत सरकारचे आयुध निर्माणी निगमिकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी मतदान घेण्यात आले.
भुसावळ : आयुध निर्माणीत सरकारचे आयुध निर्माणी निगमिकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीच्या आदेशानुसार देशव्यापी अनिश्चितकालीन संपासाठी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनच्या वतीने बुधवारी सकाळी ६.३० ते १० व दुपारी १२ ते ३ दरम्यान मतदान घेण्यात आले. सर्व कर्मचा-यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी कामावर जात असताना संपासाठी मतदान केले. सरकार आयुध निर्माणीचे निगमिकरण निणर्यावर ठाम असल्याने कामगारांनी संपाचे बाजुने भरगोस मतदान करून सरकार विरोधी रोष प्रकट केला व अनिश्चित संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
आयुध निर्माणी भुसावळच्या वतीने कनिष्ठ कार्यप्रबंधक एस.डी.भंगाळे यांच्या निरीक्षणात, श्रम कार्यालयाचे नितीन सोनावणे, ओमप्रकाश स्वामी, नितीन लोखंडे, नवीन गायकवाड, ए.एस.शेगोकारे, नीलेश पाटील व सहयोगी स्टाफद्वारे मतदानात प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.. उद्या दि. ११ रोजी मजदूर युनियन इंटक व दि.१२ रोजी आयुध निर्माणी कर्मचारी संघाच्या वतीने मतदान घेण्यात येईल.
मतदान यशस्वी करण्यासाठी आॅर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन व स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यात प्रामुख्याने किशोर पाटील, दीपक भिडे, प्रवीण मोरे, मिलेश देवराळे, जितेंद्र आंबेडकर, हिरालाल पारिसकर, नाना जैन, राजकिरण निकम, मिलिंद ठोंबरे, ज्ञानदेव सरोदे, मामा बाविस्कर यांच्यासह सर्व युनियन पदाधिकारी यांनी यशस्वी प्रयत्न केले. संयुक्त संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगिरे, प्रकाश कदम, एम.एस.राऊत यांनी मार्गदर्शन केले.