आयुध निर्माणीचे कामगार १९ जुलैपासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:56+5:302021-06-23T04:11:56+5:30
देशातील सुरक्षेसाठी लागणारे विभिन्न प्रकारचे अस्त्र, शस्त्र, दारूगोळा पुरवणारी अग्रणी आयुध निर्माणीचे निगमीकरणाच्या निर्णयाविरोधात संरक्षणच्या तिन्ही प्रमुख फेडरेशन ...
देशातील सुरक्षेसाठी लागणारे विभिन्न प्रकारचे अस्त्र, शस्त्र, दारूगोळा पुरवणारी अग्रणी आयुध निर्माणीचे निगमीकरणाच्या निर्णयाविरोधात संरक्षणच्या तिन्ही प्रमुख फेडरेशन (एआयडीईडी, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस) यांनी एकमताने निर्णय घेत अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आयुध निर्माणीचे सर्व संरक्षण कर्मचारी जवळपास ७५ हजार कर्मचारी १९ जुलैपासून अनिश्चितकालीन संपावर जाणार आहेत.
संपासाठी नोटीस १ जुलैला संरक्षण मंत्रालयास सोपवण्यात येईल. तत्पूर्वी तिन्ही फेडरेशनद्वारे २३ जून रोजी अधिकृत अधिसूचना संरक्षण मंत्रालयाला देण्यात येणार आहे. आयुध निर्माणी या देशातील सुरक्षेसाठी लागणाऱ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व अर्धसैनिक, सुरक्षा बल अन्यला आवश्यक असा दारूगोळा, विविध प्रकारची शस्त्रास्त्र पुरवण्याचे कार्य करतात. अलीकडे १६ जूनला कॅबिनेट मंत्रालयाने आयुध निर्माणी यांचे निगमीकरण करण्याचा निर्णय घेतला. निगामीकरण ही खासगीकरणाची सुरुवात असल्याने व देशाच्या सुरक्षिततेसाठी अति महत्वपूर्ण उद्योग असल्याने आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करीत अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दिनेश राजगिरे (जेसीएम ३ मेंबर, आयुध निर्माणी बोर्ड, कोलकाता) व स्थानिक संयुक्त संघर्ष समिती, आयुध निर्माणी, भुसावळ यांनी दिली.