कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 07:00 PM2018-03-11T19:00:31+5:302018-03-11T19:00:31+5:30
आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे जळगावात द्विवार्षिक अधिवेशन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘सी’ ( एन.एफ.पी.ई ) जळगाव विभागीय शाखेचे द्वैवार्षिक अधिवेशन ११ मार्च रोजी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात झाले. यामध्ये नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात येऊन कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्याविषयी पदाधिकाºयांनी ग्वाही दिली.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष आर. एस. धर्माधिकारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ युनियनचे अध्यक्ष एम.एफ. हसन, सचिव लक्ष्मण माळी, एन. बी. महाजन, एम. एन. पाटील, भूषण पाटील, एस. ई. बडगुजर, के. आर. भारुटे, लक्ष्मीकांत ठाकूर, सतीश पाटील उपस्थित होते. या वेळी पल्लेश देशमुख, विनोद मीना, सुमेध बनसोड, प्रशांत पाटील, विशाल पाटील, चेतन निकम, सचिन ठाकूर, चेतन पाटील, प्रशांत पाटील या नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला.
समस्या सोडवण्यासाठी संघटना अग्रेसर
दिल्ली येथे नुकतेच झालेले पाच दिवसीय धरणे आंदोलन, बंगलुरू येथील आॅल इंडिया अधिवेशनाच्या स्वरूपाविषयी तसेच स्थानिक पातळीवर सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत लक्ष्मीकांत ठाकूर यांनी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात धर्माधिकारी यांनी कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना नेहमी अग्रेसर असते व या पुढेही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नवीन कार्यकारिणी निवड
२०१८-२०२० या वर्षासाठी युनियनची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी आर. एस. धर्माधिकारी, सचिवपदी लक्ष्मीकांत ठाकूर, सहसचिव म्हणून मोहन सपकाळे आणि कोषाध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड करण्यात आली.
सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले तर लक्ष्मीकांत ठाकूर यांनी आभार मानले. डी. बी. इंगळे, एम. एच. दुसाने, श्रीनिवास ठाकूर, संदीप पाटील, नितीन राऊत, गणेश चौधरी, रवी पाटील यांनी परिश्रम घेतले.
व्ही. एस. लोखंडे, बी.जे. महाजन, डी. एन. ठाकूर, सारंग जैन, भांडारकर, मनोज करनकाळ, तुषार महाजन, बी. ए. अहिरे, दिनेश ठाकरे, डी.एस. साळुंखे, संतोष जालनकर, मोहन सपकाळे, पी. ए. जगताप, मंगला पवार, व्ही. ए. शिंदे, कल्याणी पाटील, पल्लवी थोटे, शाहीन तडवी, सुरेश चौधरी, अशोक सपकाळे, हेमंत ठाकूर, मुंजा चव्हाण, गोपाल पाटील, उमेश रहान, विनोद चौधरी, चेतन ठाकूर, विजय ठाकूर, विठ्ठल तिव्हाणे, अर्जुन माटोरे आदी उपस्थित होते.