संघटनात्मक कौशल्ये असलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:59+5:302021-06-20T04:13:59+5:30
पारोळा : आरोग्य शिबिराला प्रतिसाद पारोळा: आगामी जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचाच खासदार राहील, असे प्रतिपादन ...
पारोळा : आरोग्य शिबिराला प्रतिसाद
पारोळा: आगामी जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचाच खासदार राहील, असे प्रतिपादन जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी शनिवारी पारोळा येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, पक्ष हा आदेशावर चालतो. पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार काम करून पक्षाला बळकटी देणाऱ्यांना नेतृत्वाची संधीही दिली जाते. डॉ. हर्षल माने यांनी जिल्हा परिषद गटात अनेक चांगली कामे केली, त्यामुळे त्यांना जिल्हा प्रमुख या पदासाठी नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.
यावेळी शिबिरात जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, शिवसेना माजी शहर प्रमुख अण्णा चौधरी, पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ. दीपाली माने, आर.पी.आय.चे राजू जावरे, आर. टी. सोनार यांच्यासह डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. अभिषेक फिरके, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. मनीषा पाटील, डॉ. दिनेश पाटील, डॉ. पंकज संघवी, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रियंका शिंदे, डॉ. महेश पाटील, शांतीलाल चव्हाण, डॉ. निलेश देसले आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
शिबिरात आलेल्या गरजूंना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत उपचाराबाबत योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन डॉ. माने यांनी दिले. यावेळी १७५ ते २०० गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
फोटो ओळ: पारोळा येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना गुलाबराव वाघ, डॉ. हर्षल माने, अण्णा चौधरी आदी.