कोथळी येथे कृषिकन्यांनी केले कृषी माहिती कोपऱ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 07:59 PM2018-10-06T19:59:47+5:302018-10-06T20:00:49+5:30

कोथळी येथे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी माहिती कोपरा कार्यक्रम आयोजित केला होता. या आयोजनात शेतकºयांपर्यंत कृषीसंदर्भातल्या विविध माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषिकन्यांनी केले.

Organizing Agriculture Information Corners organized at Kothali | कोथळी येथे कृषिकन्यांनी केले कृषी माहिती कोपऱ्याचे आयोजन

कोथळी येथे कृषिकन्यांनी केले कृषी माहिती कोपऱ्याचे आयोजन

Next
ठळक मुद्देबोंडअळीचे नियंत्रण व व्यवस्थापन तसेच विविध पिकांच्या विविध कीड नियंत्रणासाठी केले जाणारे उपाय यावर दिली माहितीयाशिवाय सामाजिक उपक्रमांबद्दलही दिली माहिती

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कोथळी येथे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी माहिती कोपरा कार्यक्रम आयोजित केला होता. या आयोजनात शेतकºयांपर्यंत कृषीसंदर्भातल्या विविध माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषिकन्यांनी केले.
शेतकºयांनीदेखील कोथळी गावात या उपक्रमास प्रतिसाद दिला. बोंडअळीचे नियंत्रण व व्यवस्थापन तसेच विविध पिकांच्या विविध कीड नियंत्रणासाठी केले जाणारे उपाय, एकात्मिक शेतीपद्धती व जैविक शेती, खताचा योग्य वापर व पशुखाद्य व्यवस्थापन इत्यादी कृषीविषयक समस्यांवर कृषी कन्यांनी शेतकºयांना माहिती दिली.
एवढेच नव्हे तर लेक वाचवा लेक शिकवा, बालमजुरी थांबवा, शेतकरी आत्महत्या टाळा, स्वच्छतेचे महत्त्व आणि आरोग्यासाठी असलेले त्याचे फायदे अशा समाज सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती देतानाच कीटकनाशके, तणनाशके, फवारणी, खते यासंदर्भातदेखील विस्तृत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आले.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुदाम पाटील, ग्रामीण कृषि कार्यानुुभव कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.व्ही.एम.वसावे, कार्यक्रम अधिकारी जे.व्ही.कारमोरे, प्रा.विशाल वैरागर यांनी मार्गदर्शन केले. प्रा.प्रमोद पोपडे व प्रा.अनिकेत चंदनशिवे यांनी कृषीकरणाबद्दल प्रोत्साहन दिले.


 

Web Title: Organizing Agriculture Information Corners organized at Kothali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.