जळगाव येथे 5 जानेवारीपासून बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:35 PM2017-12-10T12:35:41+5:302017-12-10T12:42:55+5:30

16वा बालगंधर्व संगीत महोत्सव

Organizing Balgandharva Music Festival from Jalgaon on January 5 | जळगाव येथे 5 जानेवारीपासून बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

जळगाव येथे 5 जानेवारीपासून बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

Next
ठळक मुद्देसुफी व गझल गायनाने सुरुवात संतूर व सतारीची  जुगलबंदी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे 5 ते 7 जानेवारी दरम्यान कांताई सभागृहात 16 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच महोत्सवाची सुरुवात मुंबई येथील पूजा गायतोंडे यांच्या सुफी व गझल गायनाने होणार असल्याची माहिती   प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी चांदोरकर प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, विनायक टेंभूर्णे, दिनेश तायडे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उदघाटन 5 रोजी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर ललित कोल्हे, एम.व्यंकटेश आदी उपस्थित राहणार आहेत.  पहिल्या दिवशी दुस-या सत्रात उज्जैन येथील भगिनी संस्कृती व प्रकृती वहाने  संतूर व सतारीची  जुगलबंदी होईल.   तर दुस-या दिवशी पहिल्या सत्रात सारेगमप स्पर्धेची विजेती अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या दोन्ही बहिणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाटय़गीतांची मैफल सादर करतील.  दुस:या सत्रात नृत्यांगणा अमिरा पटवर्धन  कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. तिस:या दिवशी सकाळी 7 वाजता गांधी उद्यानात शास्त्रीय गायक आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांची मैफल होईल.  तर  दिल्लीचे उस्ताद अर्शद खान ‘इसराज’ वादन करतील.  महोत्सवाचा समारोप तबला वादक पंडित कालिनाथ मिश्रा व त्यांचे चिरंजीव सत्यप्रकाश मिश्रा यांच्या तबला जुगलबंदीने होईल. सूत्रसंचालन अभिनेत्री व निवेदक दिप्ती बर्वे या करणार आहेत. 

Web Title: Organizing Balgandharva Music Festival from Jalgaon on January 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.