जळगावमध्ये प्रथमच महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:43 PM2018-02-28T21:43:24+5:302018-02-28T21:43:24+5:30
महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायामार्फत जिल्ह्यातील नाट्यकर्मींसाठी ४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२८- महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायामार्फत जिल्ह्यातील नाट्यकर्मींसाठी ४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यस्तरावरील नामांकित एकांकिा स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त अशा सहा एकांकिका सादर करण्यात येणार आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांपासून नाट्य महोत्सव, पुरुषोत्तम करंडक, बालराज्य नाट्य स्पर्धांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाएकांकि का महोत्सवासाठी शहराची निवड केली आहे. दरम्यान, या महोत्सवानिमित्त ४ व ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी नाट्य प्रशिक्षण पोलीस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या एकांकिका होणार सादर
एकांकिका - लेखक - संस्था
१.माणसं - रायबा गजमल - नृत्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
२. कुरुप - रुपेश पवार - धनवटे नॅशनल कॉलेज, नागपुर
३. समथींगच्या सावल्या - श्रीपाद देशपांडे - मू.जे.महाविद्यालय, जळगाव
४. नथींग टु से - प्रसाद दाणे - गावंडे नवोदिता, चंद्रपुर
५. निर्वासित - स्वप्नील जाधव - सिडनहॅम कॉलेज, मुंबई
६.अनुरागम - वैभव देशमुख - स्वर्गीय छगनलाल मुंजीभाई
कोट..
जळगाव शहरात पहिल्यांदाच महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामुळे शहरातील नाट्य रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या एकांकिका महोत्सवाचा युवा कलावंतासह नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा.
-विनोद ढगे, समन्वयक,महाएकांकिका महोत्सव