राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:10+5:302021-01-08T04:50:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस १२ जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस १२ जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने १२ ते १९ जानेवारी या काळात युवा सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येतो. युवकांच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
क्रीडा कार्यालयामार्फत त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.त्यात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा मंडळे यांनी १२ ते १९ जानेवारी दरम्यान युवा सप्ताह साजरा करावा, तसेच नंतर आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
युवा सप्ताह कार्यक्रम
मंगळवार - एकलव्य क्रीडा संकुल, उद्घाटन आणि युवकांचे प्रेरणास्त्रोत, स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्वज्ञान व विचार या विषयावर व्याख्यान,
बुधवार वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा - एकलव्य क्रीडा संकुल, गुरूवार - सुर्य नमस्कार स्पर्धा ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांना लिंक पाठवण्यात येईल.
शुक्रवार - चित्रकला स्पर्धा बहिणबाई विद्यालय, शनिवार - युवकांना मार्गदर्शन वक्ते - भुषण लाडवंजारी, दिनेश पाटील, आणि राजेश जाधव, राऊत विद्यालय, सोमवार - युवकांसाठी मार्गदर्शन प्रशासकीय सेवेतील संधीची ओळख होण्यासाठी मार्गदर्शन, जितेंद्र पाटील. मंगळवार - सप्ताहाचा समारोप - खुबचंद सागरमल विद्यालय.