पाचोरा उपविभागात सातबारा दुरुस्ती शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:43+5:302021-06-24T04:12:43+5:30

विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतील प्रत्येक मंडल अधिकारी यांच्या ...

Organizing Satbara repair camp in Pachora sub-division | पाचोरा उपविभागात सातबारा दुरुस्ती शिबिराचे आयोजन

पाचोरा उपविभागात सातबारा दुरुस्ती शिबिराचे आयोजन

Next

विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतील प्रत्येक मंडल अधिकारी यांच्या मुख्यालयात हे शिबिर असणार आहे. यामध्ये सातबारा उताऱ्यामधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. शिबिराचा लाभ विविध शेतकरी, तसेच इतर सर्व खातेदार यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, पाचोरा तसेच तहसीलदार पाचोरा आणि भडगाव यांनी केले आहे.

सध्या कोविड-१९ बाबतच्या उपाययोजना पाहता एकाच दिवशी खातेदार व शेतकरी यांनी गर्दी करू नये, म्हणून हे शिबिर तीन दिवस आयोजित केले आहे.

पाचोरा तालुका-महसूल मंडळ आणि शिबिराचे ठिकाण पाचोरा : तहसील कार्यालयामधील सभागृह. गाळण-मंडळ अधिकारी कार्यालय. कुऱ्हाड-मंडळ अधिकारी कार्यालय. पिंपळगाव (हरे) - मंडळ अधिकारी कार्यालय, वरखेडी- मंडळ अधिकारी कार्यालय, नांद्रा-मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत इमारत. नगरदेवळा-मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तळमजला.

भडगाव तालुका : भडगाव-तहसील कार्यालय, इमारत शेजारी, चावडी. आमडदे-मंडळ अधिकारी कार्यालय. कजगाव-मंडळ अधिकारी कार्यालय. कोळगाव-गाव चावडी.

शिबिरात उपस्थित राहताना आपल्या कामासंबंधी आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे व एखादा विषय न्यायप्रविष्ट असेल तर त्याबाबतची अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

Web Title: Organizing Satbara repair camp in Pachora sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.