गणेश जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:20+5:302021-02-15T04:15:20+5:30
नवसाचा गणपती मंदिर जुन्या बजरंग बोगद्यासमोरील श्री नवसाचा गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजा, त्यानंतर ...
नवसाचा गणपती मंदिर
जुन्या बजरंग बोगद्यासमोरील श्री नवसाचा गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजा, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा व श्री गणेशाची आरती होणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होणार असून, भाविकांना दर्शनासाठी दिवसभर मंदिर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुजारी चेतन कपोले यांनी दिली.
श्री लाकडी गणेश मंदिर
पत्रकार भवनाजवळील श्री लाकडी गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश यज्ञ व `श्री` ची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सिद्धीविनायक मंदिर
येथील श्री चिमुकले राम मंदिरातील श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळी ६ वा. अभिषेक, पूजा, आरती, त्यानंतर सकाळी १० हभप ऋषीकेश महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
इन्फो :
श्री विद्येची देवता असलेल्या श्री गणेशाच्या जयंतीनिमित्त सोमवारी श्री चिमुकले राम मंदिरातील सिद्धी विनायक मंदिरात सकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक नागरिक या दिवशी उपवासही करतात. भक्तांना इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस आहे.
हभप दादा महाराज जोशी