अमळनेर येथे युवा श्रमसंस्कार छावणीचे आयोजन
By admin | Published: May 22, 2017 12:08 PM2017-05-22T12:08:42+5:302017-05-22T12:08:42+5:30
सानेगुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे 26 ते 31 मे दरम्यान खान्देशस्तरीय युवा श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
अमळनेर,दि.22- सानेगुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे 26 ते 31 मे दरम्यान खान्देशस्तरीय युवा श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रताप महाविद्यालयात हे छावणी शिबिर होणार आहे.
26 रोजी सायंकाळी 4 वाजता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्याहस्ते या छावणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिराचे हे नववे वर्ष आहे.
मानवतेची प्रेरणा युवकांर्पयत पोहचविणे व खान्देशातील युवकांचा क्षमता विकास करण्यासाठी या छावणीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
तरूणांमध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय ही संविधानिक मुल्ये, तसेच विवेकी व्यक्तीमत्व विकास, निर्भयता, श्रमप्रतिष्ठा सेवा ही मानवी मुल्ये रूजावित हा प्रय}ा या सहा दिवसातल्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून केला जातो. छावणीप्रमुख म्हणून आर.बी.पवार यांची निवड करण्यात आली आहे.
छावणीत 15 ते 25 वयोगटातील युवकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन सानेगुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चेतन सोनार, समन्वयक अविनाश पाटील, कार्यवाहक गोपाळ नेवे, अध्यक्ष प्रा.अरविंद सराफ, प्रा.सुनील पाटील यांनी केले आहे.