ओरियन, झांबरे विद्यालय उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:57 AM2017-09-21T00:57:01+5:302017-09-21T01:03:06+5:30

Orion, Zambre Vidyalaya in the semifinals | ओरियन, झांबरे विद्यालय उपांत्य फेरीत

ओरियन, झांबरे विद्यालय उपांत्य फेरीत

Next
ठळक मुद्देजैन चॅलेज चषक : हर्षवर्धन मालू आणि आतिक तडवी सामनावीरहर्षवर्धन मालू याने बाद केले चार गडीझांबरे विद्यालयाच्या तेजस कोळीचे पाच गडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या जैन चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि ए. टी. झांबरे विद्यालयाने उपांत्य फेरी गाठली आहे.  
अनुभूती स्कूलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने प्रोग्रेसिव्ह स्कूलचा ८९ धावांनी पराभव केला. ओरियन स्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत ९ गडी बाद १३४ धावा केल्या. गोविंद निंभोरे याने ४० धावांचे योगदान दिले. तर आदित्य विसपुते याने २२ आणि हर्षवर्धन मालू याने १७ धावांचे योगदान दिले. 
प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या रितेश खडसे याने ३ बळी घेतले. तर ध्रुव पाटील आणि प्रथमेश साळुंखे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नरेंद्र पाटील आणि साहिल शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. रितेश खडसे याने भेदक मारा केला. मात्र त्याच्या प्रयत्नांना इतर गोलंदाजांची फारशी साथ लाभली नाही.
प्रत्युत्तरात २५ षटकांत १३५ धावांचे आव्हान असताना प्रोग्रेसिव्ह स्कूलचा संघ १८ षटकांत फक्त ४५ धावा करू शकला. त्यांच्यातर्फे अनिश गायकवाड सर्वाधिक १३ धावा केल्या. ओरियन स्कूलच्या हर्षवर्धन मालू याने ५ षटकांत ८ धावा देत ४ गडी बाद केले. गोविंद निंभोरे याने २ तर आदित्य विसपुते आणि तेजस भालेराव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 
अन्य सामन्यात ए.टी. झांबरे विद्यालयाने विद्या इंग्लिश स्कूलविरोधात २५ षटकांत ५ गडी बाद १०८ धावा केल्या.  त्यात राधे पवार याने सर्वाधिक ४४ धावा केल्या.  सुमित भगत याने १८ धावांचे योगदान दिले. विद्या स्कूलच्या चेतन मराठे, लोकेश गोयर, तुषार महाजन आणि लोकेश सोनार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात विद्या स्कूलचा संघ ७.२ षटकांत १४ धावातच तंबूत परतला. 
झांबरे विद्यालयाच्या तेजस कोळी याने ५ गडी तर आतिक तडवी याने ४ गडी बाद केले. 

Web Title: Orion, Zambre Vidyalaya in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.