...अन्यथा रस्ते शासनाकडे वर्ग करा
By admin | Published: March 7, 2017 11:32 PM2017-03-07T23:32:08+5:302017-03-07T23:32:08+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दैनावस्था आहे. अनेकदा सर्वत्र काम करणे शक्य होत नाही.
जळगाव : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दैनावस्था आहे. अनेकदा सर्वत्र काम करणे शक्य होत नाही. ग्रामस्थांचा या रस्त्यांबाबतचा त्रास कमी करायचा असेल तर हे रस्ते जि.प.कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत, अशी मागणी जि.प.सदस्य डॉ.उद्धव पाटील यांनी मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत केली.
शाहू महाराज सभागृहात ही सभा झाली. व्यासपीठावर अध्यक्ष प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मिना पाटील, दर्शना घोडेस्वार, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील होते.
सत्कारावरुन नाराजी
जि.प.मध्ये महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेण्याचे, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी प्राधान्य देण्याचे पत्र दिले आहे. यानुसार सभा सचिव राजन पाटील यांनी पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार आयोजित केला. त्यात प्रथम मिना रमेश पाटील यांचा सत्कार झाला. पण आपली ज्येष्ठता डावलली, आपण सत्कार स्वीकारणार नाही, प्रथम आपला सत्कार करायला हवा होता, असे काँग्रेसचे प्रभाकर सोनवणे म्हणाले. पण नंतर इतर सदस्यांची त्यांची मनधरणी केली.
सभेत सीईओ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पूर्वी काही महिला पदाधिकाºयांचे पती कामकाज पाहायचे. सभापती दर्शना घोडेस्वार यांच्या पती यांचा फोन मला यायचा. पण आता कुठलेही काम, मुद्दा सोडविण्यासाठी स्वत: दर्शना घोडेस्वार या संपर्क साधायच्या. महिला सदस्यांनी आपला कारभार स्वत: चालवावा, असे सीईओ पांडेय म्हणाले.
अधिकाºयांचे कौतुक
उपाध्यक्ष आमले, सभापती धनके, सदस्य प्रकाश सोमवंशी, इंदिराताई पाटील, अशोक कांडेलकर व इतरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सीईओ आस्तिककुमार पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील आदींचे कौतुक केले.