पाच वर्षांत १२ हजारपैकी फक्त सहा हजार घरकुलांचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:56+5:302020-12-06T04:16:56+5:30
गेल्या पाच वर्षांत शासनाकडुन नियमित निधी येत असल्यामुळे, १२ हजारांपैकी निम्म्याच घरांचे काम पूर्ण झाले आहे. कधी निधी नाही ...
गेल्या पाच वर्षांत शासनाकडुन नियमित निधी येत असल्यामुळे, १२ हजारांपैकी निम्म्याच घरांचे काम पूर्ण झाले आहे. कधी निधी नाही तर कधी वाळू नसल्यामुळे कामे रखडल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टापैकी ७० टक्केच घरांचे काम पूर्ण होत आहेत. २०१८ मध्ये तर ३ हजार ७०० पैकी १ हजार ८६७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. तर २०१९ मध्ये ४ हजार ६६ इतके उद्दिष्ट असतांना,या घरांसाठी शासनाकडून निधीच आला नाही. गेल्या वर्षापासून ही योजना रखडली आहे. या वर्षांतही शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे, ही योजना बारगळ्याची शक्यता निर्माण आहे.
इन्फो :
१ लाख २० हजारांचे मिळते अर्थसहाय्य :
या योजनेतील लाभार्थांना घरकुल बांधण्यासाठी शासनातर्फे प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रूपये इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे. हे अर्थ सहाय्य देतांना लाभार्थांच्या बांधकामाची वेळोवेळी पाहणी करून, चार हफ्त्यात हे पैसे देण्यात येत आहेत.
इन्फो :
पाच वर्षांत ९९ कोटींचा निधी झाला उपलब्ध :
शासनाकडून दरवर्षी मागविलेल्या उद्दिष्टानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत रमाई योजने अंतर्गंत घरकुलांच्या बांधकामासाठी शासनाकडून ९९ कोटी ४२ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. या पैकी ७२ कोटी ८५ लाख २० हजार इतका निधी खर्च झाला आहे.
इन्फो :
२०१६ : १ हजार ७८५
१ हजार ६८८
२०१७ : २ हजार ८००
२ हजार ५१६
२०१८ : ३ हजार ७००
१ हजार ८६७
२०१९ : ४ हजार ६६
: ०
२०२० : शासनाकडूनच उदिष्ठ नाही.
घरांना मंजुरी : १२ हजार ३५१
घरे पूर्ण : ६ हजार ०७१.