पहूर ग्रामीण रूग्णालयात बाह्यरूग्णसेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:10 PM2019-06-01T19:10:31+5:302019-06-01T19:13:03+5:30
परिचारकास मारहाणीचा निषेध : दोनवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
पहूर ता जामनेर:- येथील ग्रामीण रूग्णालयातील अधिपरीचारक अबादेव (अविनाश) कराड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी शनिवारी कामबंद आंदोलन केल्याने बाह्यरूग्णसेवा बंद राहिली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. तर दोन वैद्यकीय अधिकाºयांनी तडकाफडकी राजीनामे दिले.
ग्रामीण रूग्णालयात जखमींवर शुक्रवारी उपचार करताना जि.प.सदस्य अमित देशमुख व अधिपरीचारक अबादेव कराड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने त्यांना मारहाण झालीहोती. यामुळे परीस्थिती हाता बाहेर गेली. याप्रकरणी अमित देमुखांसह चार ते पाच जणांना विरुद्ध अबादेव कराड यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
अधिपरीचारकाविरुद्धही गुन्हा
रूग्णालयातील ड्रेसिंग रूममध्ये जखमी महिलेवर उपचार सुरू असताना अधिपरीचारक अबादेव कराड याने जखमी महिलेच्या अंगावर हात फिरवून विनयभंग केला. व गळ्यातील एक तोळा सोन्याची पोत ओढून घेतली. तसेच हे तू कोणाला सांगितले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी कराड याने दिली, असे जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले असून अधिपरीचारकाविरुद्ध भादवी ३५४,३९२ ३२३,५०४,५०६ विनयभंग, जबरी चोरी, दमदाटी शिविगाळ व मारहाण असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाणीमुळे अधिपरीचारक अबादेव कराड यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट
जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी शनिवारी सकाळी आठ वाजता ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असून या रुग्णालयावर सुमारे २५ खेडे अवलंबून असून त्यांची गैरसोय टाळण्यासाठी कामबंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले मात्र कर्मचाºयांनी प्रतिसाद दिला नाही. केवळ अत्यावशक सेवा मात्र सुरु ठेवली.
दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल महाजन व डॉ. मंजुषा पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी घटनेची माहिती देत नंतर दुपारी दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांनी राजीनामे दिल्याचे लोकमतला सांगितले. याचबरोबर अधिपरीचारक दिपक वाघ यांनी ही बदलीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविला आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा हे असून यांच्याकडे जामनेर व बोदवड या गावांचा अतिरिक्त भार असल्याने ते पूर्ण वेळ रुग्णालयाला देऊ शकत नाही. तर दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांी राजीनामा दिल्यामुळे सध्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णसेवा कोलमडणार आहे.
रुग्णालय राजकीय केंद्र बिंदू
नेहमी वादामुळे हे रुग्णालय चर्चेत असल्याने वैद्यकीय अधिकारी पहूर रुग्णालयाला नापंसती दर्शवितात. गेल्या दोन वषार्पासून वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांच्यासह सहकाºयांनी रुग्णालय सुस्थितीत आणल्याचे पहावयास मिळत असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालय चर्चेत आले आहे.आता पर्यंतच्या घटनांमध्ये राजकारणच झाल्याचे सुज्ञ नागरीक सांगतात.याचा विपरीत परिणाम रुग्ण सेवेवर होत असल्याचा सूर उमटत आहे.