खेडा खरेदीमुळे मालाची आवक मंदावली

By admin | Published: March 10, 2017 12:01 AM2017-03-10T00:01:58+5:302017-03-10T00:01:58+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती : हमाल- मापाडी यांच्यावर उपासमारीची वेळ

Output slump due to purchase of village | खेडा खरेदीमुळे मालाची आवक मंदावली

खेडा खरेदीमुळे मालाची आवक मंदावली

Next

चाळीसगाव : शेतक:यांच्या  शेतीमालासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती असताना ग्रामीण भागात खेडा पद्धतीने अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी सुरू असल्याने बाजार समितीत  मालाची आवक एकदम कमी असल्याने हमाल व मापाडी यांची उपासमार होत आहे. याची दखल घेत कारवाई व्हावी अशी मागणी हमाल कामगार युनियनतर्फे करण्यात आली आहे.
बाजार समितीत शेतक:यांचा भुसार माल, मका, गूळ, मिरची, कडधान्य आदीची विक्री लिलाव पध्दतीने केली जाते.  शेतीमालास योग्य भाव  मिळावा, त्यास अधिक पैसे मिळावे. मालास संरक्षण मिळावे तसेच  व्यवहार सुरळीतेसाठी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे नियंत्रण  आहे. यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर अनधिकृतपणे  शेतमालास खरेदी-विक्रीस बंदी असताना  चाळीसगाव तालुक्यात  खडकी बु।, शिंदी आदी अनेक खेडय़ात शेतक:यांच्या शेती मालाची खेडा खरेदी अनधिकृतपणे  मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक कमी झाली आहे. व्यवहार होत नसल्याने हमाल मापाडी कामगारांची मोठय़ा प्रमाणावर उपासमार होत आहे.  दरम्यान काही ठिकाणी खेडा खरेदी शेतमालाचा पंचनामाही झाला असून चेअरमन व सेक्रेटरी  यांचेकडून  कोणतीच  कारवाई झाली नाही. हमाल मापाडी कामगारांना  महिना बारी वेतन कृषी  उत्पन्न बाजार समिती  चाळीसगाव यांनी द्यावे अशी मागणी देविदास बोंदार्डे, सरचिटणीस हमाल मापाडी कामगार युनियन  चाळीसगाव यांनी केली आहे.  (वार्ताहर)
कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुईकाटा नादुरुस्ती प्रकरणी वजनमाप इन्स्पेक्टर याचेमार्फत  चौकशी नुकतीच झाली होती. यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव यांना सुमारे 40 हजार रुपये दंड झाला आहे. तो कोणी भरला? त्यात कोण दोषी याबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही हमाल कामगार युनियनने केली आहे.

Web Title: Output slump due to purchase of village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.