शहरातील सक्रिय रुग्ण १ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:17 AM2021-05-18T04:17:52+5:302021-05-18T04:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून घटत असून सोमवारीही ६२ नवे रुग्ण आढळून आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून घटत असून सोमवारीही ६२ नवे रुग्ण आढळून आले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या ५ दिवसांपासून रुग्णसंख्या ही १०० पेक्षा कमी झाली आहे. याचा परिणाम सक्रिय रुग्णांची संख्या घटून १०७४ वर आली आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या २५०० वर गेलेली होती.
शहरातील तीन बाधितांचा मृत्यू झाला असून १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील ६७, ७०, ७३ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश असून यासह भुसावळ तालुक्यातील ४, रावेर, यावल, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून मृतांची संख्याही घटून निम्म्यावर आली आहे तर दुसरीकडे गंभीर रुग्णांची संख्याही घटली आहे.
अशा आहेत चाचण्या
ॲन्टीजन ३२४३, बाधित ४८०
आरटीपीआरचे आलेले अहवाल १७२५, बाधित १४२
आरटीपीआसरच्या तपासण्या १०३३
रुग्णांची स्थिती
सक्रिय रुग्ण ९६५६
लक्षणे असलेले १९६७
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारे ९५७
आयसीयूमधील रुग्ण ५६६
ऑक्सिजन टँक भरला
सोमवारी टँकर आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक मध्ये १६ मेटीक टन लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आले. आगामी दोन दिवस रुग्णालयाला दिलासा राहणार आहे.