१,३००च्या वर रुग्ण ऑक्सिजनवर, वर्षभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:55+5:302021-04-08T04:15:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या सहा दिवसांत कोरोनाचा सर्वाधिक फटका हा जळगाव शहर आणि चोपडा तालुक्याला ...

Over 1,300 patients on oxygen, the highest number of patients throughout the year | १,३००च्या वर रुग्ण ऑक्सिजनवर, वर्षभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या

१,३००च्या वर रुग्ण ऑक्सिजनवर, वर्षभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या सहा दिवसांत कोरोनाचा सर्वाधिक फटका हा जळगाव शहर आणि चोपडा तालुक्याला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या दोन्ही ठिकाणी कोरोनाचे अडिचशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही या दोन ठिकाणांशिवाय फक्त भुसावळ तालुक्यात जास्त आहे.

दीड ते दोन महिन्यांत कोरोना जास्तच वेगाने पसरला. त्याचा सर्वाधिक फटका हा चोपडा तालुका आणि जळगाव शहराला बसला. सध्या चोपडा तालुक्यात २,५६० रुग्ण उपचार घेत आहेत, तर जळगाव शहरात २,५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच भुसावळलाही १ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत

६ एप्रिल रोजी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,३१२ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण ५५७ आहेत. आयसीयूमध्ये दाखल रुग्णांना व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ऑक्सिजन दिला जातो. ऑक्सिजनवर असलेले १,३१२ आणि आयसीयूत असलेले ५५७ रुग्ण हे गेल्या वर्षभरातील सर्वोच्च आकडेवारी आहे.

गंभीर रुग्णांसोबत मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल ८७ मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यातील ११,६४६ रुग्णांपैकी लक्षणे असलेले रुग्ण हे २,६२१ आहेत, तर लक्षणे नसलेले रुग्ण हे ९,०२५ आहे.

बाधित ॲक्टिव्ह रुग्ण मुक्त मृत्यू

१ एप्रिल ११६७ ११८१३ ११४४ १३

२ एप्रिल ११४२ ११७१८ १२२२ १५

३ एप्रिल ११९४ ११५७३ १२२४ १५

४ एप्रिल ११७९ ११५७९ ११५९ १४

५ एप्रिल ११८२ ११६५६ १०९० १५

६ एप्रिल ११७६ ११६४६ ११७१ १५

७ एप्रिल-- -- -- --

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

जळगाव शहर २,५०७

जळगाव ग्रामीण ३७६

भुसावळ १,०००

चोपडा २,५६०

धरणगाव ५०४

भडगाव ४२५

चाळीसगाव ४७४

Web Title: Over 1,300 patients on oxygen, the highest number of patients throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.