आठवडाभरात १६०० रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:19 AM2021-04-30T04:19:54+5:302021-04-30T04:19:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बाधितांचे प्रमाण कमी झाले असून बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक असून याने ...

Over a week, 1,600 patients had coronary heart disease | आठवडाभरात १६०० रुग्णांची कोरोनावर मात

आठवडाभरात १६०० रुग्णांची कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बाधितांचे प्रमाण कमी झाले असून बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक असून याने आठवडाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४१५ ने घटली. गेल्या आठवडाभरात शहरातील १६२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्या तुलनेत १२३० नवे रुग्ण समोर आले आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना कमी होत असल्याचे एक दिलासादायक चित्र शहरात निर्माण झाले आहे.

गेल्या आठवडाभरात जिल्हाभरातील रुग्णसंख्या ही ११०० च्या खाली असून १ हजारांपर्यंत स्थिर आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्या वाढली असतानाही रुग्णसंख्याही स्थिर असल्याने पॉझिटिव्हिटी घटली आहे. यात शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. अनेक हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या घटली असून यात खोटेनगर, पिंप्राळा अशा भागांत रुग्ण कमी समोर येत आहेत. शहरासह चोपड्यातही दिलासादायक स्थिती असल्याचे अहवालावरून समोर येत आहे. चोपड्यातही रुग्णसंख्या घटून आता ॲक्टिव्ह केसेसची संख्या एक हजारापेक्षा कमी झाली आहे.

सक्रिय रुग्ण असे

जळगाव शहर १८३९

भुसावळ ११८९

जामनेर ९२४

चोपडा ८६०

रावेर ८४४

एरंडोल ७१०

अमळनेर ७०६

चाळीसगाव ५२९

पाचोरा ५००

मुक्ताईनगर ४५४

बोदवड ४०७

जळगाव ग्रामीण ४००

यावल ३९०

धरणगाव३५१

पारोळा ३४६

भडगाव २०४

आताची शहराची स्थिती

एकूण रुग्ण ३००्र९०

बरे झालेेले रुग्ण २७७५६

सक्रिय रुग्ण १८३९

आठवड्यापूर्वीची स्थिती

एकूण रुग्ण २८८६०

बरे झालेले रुग्ण २६१३३

सक्रिय रुग्ण २२५४

हा दिलासा

नवे रुग्ण १२३०

रुग्ण झाले आठवड्यात बरे १६२३

गंभीरता कमी होणे आवश्यक

रुग्ण कमी असले तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. त्यासाठी नागरिकांनी तातडीने तपासणी करून घेणे, हेच यावरचे सध्याचे मोठे औषध असल्याचे डॉक्टर सांगतात. जर लोकांनी तातडीने कोरोनाचे निदान केल्यास गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, असेही डॉक्टर सांगतात.

Web Title: Over a week, 1,600 patients had coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.