अतिपावसाने उडीद, मुगाचे ५० टक्के नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:33 PM2019-09-29T12:33:37+5:302019-09-29T12:34:07+5:30
शेतात पाणी साचल्याने कापसाचे उत्पन्न घटणार
जळगाव : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे़ मात्र, बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे व शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्हाभरात ४० ते ५० टक्के उडिद व मूग खराब झाला आहे तर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे़
जिल्हाभरात कापासाची सुमोर ५ लाख दहा हजार हेक्टरवर लागवड होत असते.
तर उडिद ३२ हजार व मुगाची सुमारे २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली़ धरणे ओव्हरफ्लो झाली मात्र, कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून याचा पिकांवर परिणाम झाला आहे़ ज्वारी काळी पडली आहे़ जूनमध्ये लागवड केलेल्या बागायती कापसाची बोंडे सडली आहेत़ जिरायती कापसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही़ त्यातच विविध प्रकारच्या किडींच्या प्रादूर्भाव वाढल्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची यंदा शक्यता आहे़
जिथे-जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी कापसाची वाढ खुंटली आहे़ याशिवाय रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़
मुक्ताईनगरला पाहणी केल्यानंतर ज्वारीच्या कणसांमध्ये पाणीसाचून ते काळे पडत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी उडिदाचे ४० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. उडीदाची गुणवत्ता खराब झाली आहे़ शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पीक काढणेही सोडून दिले आहे़ मात्र, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव.