अन् भर उन्हाळ्य़ात नदीला आला पूर
By admin | Published: April 1, 2017 01:11 PM2017-04-01T13:11:55+5:302017-04-01T13:11:55+5:30
चोपडा तालुक्यातील गूळ नदीवरील गूळ मध्यम प्रकल्पातून चोपडा शहरासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने कोरडय़ाठाक पडलेल्या नदीला भर उन्हाळ्य़ात पूर आल्याचा प्रत्यय तालुकावासीयांना आला.
आवर्तन : चोपडा शहराला दिलासा
चोपडा, जि. जळगाव, दि.1 - चोपडा तालुक्यातील गूळ नदीवरील गूळ मध्यम प्रकल्पातून चोपडा शहरासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने कोरडय़ाठाक पडलेल्या नदीला भर उन्हाळ्य़ात पूर आल्याचा प्रत्यय तालुकावासीयांना आला.
चोपडा शहरासाठी गूळ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने चोपडा नगरपालिकेने पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार गूळ मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. हे पाणी तापी नदीपात्रातील डोहात साठविले जाणार असून तेथून चोपडा शहराला पाणीपुरवठा केला जाईल. या आवर्तनामुळे चोपडावासीयांना दिलास मिळाला आहे.
कोरडय़ा नदीत खळखळाट
सध्या गूळ नदी कोरडीठाक पडली होती. या आवर्तनामुळे भर उन्हाळ्य़ात या नदीला पूर आला.