कागदी बंडल देऊन पैसे लुबाडणारी परप्रांतीय टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:42 PM2018-07-27T18:42:37+5:302018-07-27T18:48:14+5:30

बॅँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या वृध्द ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात कागदी बंडल देऊन ग्राहकांनाच लुटणाऱ्या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवी पेठेतील बॅँकेच्या बाहेरच पकडले.

The overpriced gang caught money by paying a bundle of paper | कागदी बंडल देऊन पैसे लुबाडणारी परप्रांतीय टोळी पकडली

कागदी बंडल देऊन पैसे लुबाडणारी परप्रांतीय टोळी पकडली

Next
ठळक मुद्देजळगाव शहर पोलिसांची कामगिरीजळगावात दोन ठिकाणी लुबाडणूक केल्याची कबुलीअटकेतील आरोपी परप्रांतीय

जळगाव : बॅँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या वृध्द ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात कागदी बंडल देऊन ग्राहकांनाच लुटणाऱ्या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवी पेठेतील बॅँक आॅफ महाराष्टÑ या बॅँकेच्या बाहेरच पकडले. या टोळीतील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीने शहरात दोन ठिकाणी लुटल्याची कबुली दिली आहे.
अब्दुल अव्वल अब्दुल्ला अन्सारी (वय २८ रा.मुबारक मोहल्ला, ता.खैराबाद जि.मऊ उत्तर प्रदेश, ह.मु.ठाकुरपाडा, ठाणे), भावेश लालजी पटेल (वय ३७, रा.गांधीधाम भूज, गुजरात ह.मु.पनवेल) व उमेश रमेश कुशवाह (वय ३०, रा.झांसी, उत्तर प्रदेश, ह.मु. उल्हास नगर) असे अटक केलेल्या टोळीच्या सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

Web Title: The overpriced gang caught money by paying a bundle of paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.