ओव्हरटेक केल्याने बस चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:22 PM2017-07-20T12:22:48+5:302017-07-20T12:22:48+5:30
याप्रकरणी टेम्पो चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला इंगळे यांनी तक्रार दिली आहे.
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 20 - ओव्हरटेक केल्याच्या रागातून टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने औरंगाबाद आगाराचे एस.टी.चालक भिकन बाळा इंगळे यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी अजिंठा चौकात घडली. या मारहाणीत इंगळे यांना हाताला व बोटांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला इंगळे यांनी तक्रार दिली आहे. औरंगाबाद-जळगाव बस (क्र.एम.एच.40.एन.9795)औरंगाबादकडून जळगावकडे येत असताना काशीनाथ लॉजजवळ एस.टी.चालक इंगळे यांनी पुढे चालणा:या टॅम्पो ट्रॅव्हलरला (क्र.एम.एच.04-9778) ओव्हरटेक केला.पुढे अंजिठा चौकात प्रवाश्यांना उतरविण्यासाठी ही बस थांबली असता मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने महामार्गावर एस.टी चालकाला कॅबिनमधून बाहेर ओढत वाद घातला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून प्रचंड गर्दी झाली होती.या घटनेनंतर इंगळे यांनी बस स्थानकात प्रवाशांना सोडल्यानंतर आगारात अधिकारी व कर्मचा:यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.