मालक दुबईला, इकडे दुकानाला आग; पाईपासह प्लास्टिक साहित्य जळून खाक

By विजय.सैतवाल | Published: July 25, 2023 12:17 AM2023-07-25T00:17:05+5:302023-07-25T00:17:20+5:30

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क,  जळगाव : शहरातील बोहरी गल्ली भागामध्ये सोमवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अब्दुल असोसिएट ...

Owner to Dubai, shop fire here; Burn plastic materials including pipes | मालक दुबईला, इकडे दुकानाला आग; पाईपासह प्लास्टिक साहित्य जळून खाक

मालक दुबईला, इकडे दुकानाला आग; पाईपासह प्लास्टिक साहित्य जळून खाक

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील बोहरी गल्ली भागामध्ये सोमवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अब्दुल असोसिएट या दुकानाला आग लागून दुकानातील पाईप, प्लास्टिक वस्तू व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. दरम्यान दुकान मालक हे दुबई येथे गेले असून अग्निशमन दल व पोलिसांनी दुकानाचे कुलूप तोडून आग नियंत्रणात आणली.

शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या बोहरी गल्ली भागामध्ये तीन भावांचे वेगवेगळे दुकान आहे. यातील अब्दुल असोसिएट या दुकानामधून रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास धूर येत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या काही जणांना दिसले. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. काही वेळातच घटनास्थळी तीन बंब दाखल झाले. त्यांनी बाहेरून पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. यावेळी पोलिस पथकदेखील त्या ठिकाणी पोहोचले.bमात्र दुकान मालक हे दुबई येथे गेले असल्याचे यावेळी समजले. मोहरम निमित्त आयोजित प्रवचनासाठी अनेक बोहरी बांधव दुबईला गेले आहे. त्यामुळे दुकाने बंद आहेत. त्यात सोमवारी रात्री अचानक या दुकानाला आग लागली.

दुकान मालक नसल्याने पोलिसांसमक्ष कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी देखील आत मध्ये धूर निघतच होता. त्यामुळे पुन्हा पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली.

Web Title: Owner to Dubai, shop fire here; Burn plastic materials including pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव