दोनगावला पित्याने केला मुलीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:49 PM2017-07-27T12:49:57+5:302017-07-27T12:51:09+5:30
ऑनर किलिंग : प्रेम प्रकरणातून बदनामी झाली
ऑनलाईन लोकमत
धरणगाव, जि. जळगाव, दि. 27 - लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा हट्ट करणा:या मुलीचा तिच्या पित्यानेच गळा आवळून खून केल्याची घटना 26 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या आँनर किलिंग च्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर स्वत: आरोपी पिता पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने घटनेची कबूली दिली.
या घटनेसंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दोनगाव ता.धरणगाव येथील फिर्यादी तथा आरोपी असलेल विश्वास पितांबर पाटील (वय 47) यांच्या मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबध होते. मात्र घरच्यांनी गेल्या वर्षी तिचे लग्न करुन दिले होते. लग्न झाल्यानंतर सुध्दा ती गावातील मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे बदनामी झाली.परत आल्यावर तिला समजाविण्याचा प्रय} केला. मात्र मुलीने मी ‘त्या’ मुलाबरोबरच राहणार असा हट्ट धरला होता.
मुलगी आपले ऐकत नाही, आपली बदनामी झाल्याचा राग आल्याने दि. 27 च्या रात्री 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास झोपलेल्या मुलीचा पित्यानेदोरीने गळा आवळून खून केला. व स्वत: पोलिसात हजर झाले. व केलेल्या कृत्याची माहिती दिली. या प्रकरणी आरोपी विश्वास पाटील यांना अटक करण्यात आली.
गेल्या चार महिन्यापूर्वी धरणगाव येथे बापाने अनैतिक संबधाचा राग आल्याने मुलीचा गळा आवळून खून केला होता. त्याची पुनरावृत्ती दोनगाव मध्ये झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.