वर्षभराआधी काम केलेल्या मालकाची केबल लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:20+5:302021-05-29T04:13:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खोटेनगर ते साईनगरपर्यंतच्या भागातील सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीची टीव्ही केबल चोरून नेल्याप्रकरणी तालुका ...

The owner's cable, which worked a year ago, was lengthened | वर्षभराआधी काम केलेल्या मालकाची केबल लांबविली

वर्षभराआधी काम केलेल्या मालकाची केबल लांबविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खोटेनगर ते साईनगरपर्यंतच्या भागातील सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीची टीव्ही केबल चोरून नेल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धनश्याम दत्तात्रय फालक हे कुटुंबासह योगेश्वर नगरात वास्तव्यास आहेत. ते टीव्ही केबलचा व्यवसाय करतात. दरम्यान, २५ रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर चोरट्यांनी त्यांची खोटेनगर ते साईनगरपर्यंतची सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीची केबल चोरून नेली होती. या प्रकरणी २७ मे रोजी त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात संजय मोतीलाल कुमावत (रा.हरिविठ्ठलनगर) व दीपक बन्सीलाल माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला.

शहरातून अटक

संजय व दीपक शहरात वावरत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे विश्वनाथ गायकवाड यांना शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यांनी दोघांना अटक केली, नंतर न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती दोघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करणे सुरू आहे.

वर्षभराआधी केबल चालकाकडे कामाला...

केबल चालक फालक यांच्याकडे संजय व दीपक हे दोघे वर्षभराआधी कामाला होते. दोघांनी काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे केबल चोरी केली होती. मात्र, समज देऊन दोघांना सोडून देण्यात आले होते, अशी माहिती केबल चालक फालक यांनी पोलिसांना दिली.

Web Title: The owner's cable, which worked a year ago, was lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.